‘या’ अभिनेत्रीचा थाटच न्यारा ! पहा सोन्याचे घड्याळ, चांदीच्या चपला आणि रोज दुधाने अंघोळ करते ‘ही’ अभिनेत्री, नाव वाचून हैराण व्हाल

डान्स इंडिया डान्स , ये रिश्ता क्या केहलता है मध्ये काम करणारी मोहेना कुमारी सिंग तर आपल्या सर्वाना माहीतच आहे. भोळपाच्या एका राजपरिवारातील ती, राजकुमारी आहे. तिने डान्स इंडिया डान्स मधून टेलिव्हिजन मध्ये एंट्री घेतली आणि त्यानंतर तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
मात्र तिला ती लोकप्रियता स्वतःच्या बळावर मिळाली, तिने सतत सांगितले होते की मला कुटुंबाचे नाव नाही स्वतःच्या नावाने ओळख कमावण्याची आहे आणि ती मिळवलीच. आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे, राजघराण्यातून असतात मात्र, स्वतःची ओळख निर्माण करायची म्हणून आपली ती ओळख ते लपवून ठेवतात.
दिया मिर्झा, अदिती राव हयाद्री हे त्यापैकी च काही नाव आहेत. या दोघी देखील राजकुटुंबाच्या सदस्य आहेत मात्र, आपली वेगळी ओळख निर्माण करायची म्हणून कित्येक दिवस त्यांनी याबद्दल कोणाला सांगितलं देखील नाही. असेच काही आहे या अभिनेत्रीबद्दल. मात्र तिने आपले राजघराणे असल्याचे कोणापासून लपवून ठेवले नाही. बालकलाकार म्हणून तिने टेलिव्हिजन मध्ये पदार्पण केले आणि आता एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.
वीर की अरदास वीरा या मालिकेमधील वीरा म्हणजेच दिगंगा सूर्यवंशी सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र,या मालिकेच्या आधी तिने काही मालकांमध्ये छोटे रोल्स देखील केले होता. क्या हादसा क्या हकीकत या मालिकेमध्ये बालकलाकारची भूमिका साकारल्या नंतर, कुबुल है या मालिकेमध्ये देखील ती झळकली होती.
मात्र, रणविजय ची लाडकी बहीण म्हणजेच वीरा या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. या मालिकेनंतर तिने, टेलिव्हिजन मधला सगळ्यात मोठा रियालिटी शो, बिग बॉस मध्ये ती गेली. ती बिग बोस भाग बनली त्याच वेळी,तिचा वाढदिवस होता आणि तेव्हा तिने वाढदिवस कसा साजरा करतो याबद्दल खुलासा केला होता.
वाढदिवसाच्या दिवशी, सगळ्यात पहिले तिला उटणे, चंदन, सुगंधी तेल लावून दुधाने अंघोळ घालण्यात येते. त्यानंतर तिच्या वडिलांनी दिलेले सोन्याचे घड्याळ आणि कलकत्त्यावरून खास बनवून घेतलेली चांदीच्या चप्पल ती घालते. तिला सोन्याचे मनी असलेला सुंदर मुकुट घातला जातो, आणि एक सुंदर असा डिझायनर ड्रेस ती घालते.
असे तिने सांगितले होते, ते ऐकून सलमान खान देखील अवाक झाला होता. ती एका मोठ्या राजघराण्यातून येते. अनेक देवांना साकडे घातल्यानंतर तिचा जन्म झाला आहे, म्हणून अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपलं जात. सध्या ती दक्षिण सिनेमांमध्ये काम करत आहे.