‘या’ अभिनेत्यावरून रविना टंडन आणि करिष्मा कपूरमध्ये झाले होते कडाक्याचे भांडण, आजही आहेत कट्टर दुष्मन..

९० च्या दशकात अभिनेत्री करिश्मा कपूर आणि रविना टंडन आघाडीच्या अभिनेत्री होत्या. दोघांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली होती. सुरुवातीला करिश्माचे काही चित्रपट फ्लॉप गेले होते त्यामुळे तिला प्रचंड प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. पण त्या नंतर तिला खरी ओळख मिळाली ती अमीरसोबत केलेल्या राजा हिंदुस्थानी चित्रपटामुळे.
या चित्रपटातील विशेष आकर्षण होते ते अमीर करिश्माचा कि स सिन जो जवळपास ५ मिनिटे चालला होता. प्रेक्षक फक्त हा सिन बघण्यासाठी चित्रपट गृहात येत होते. दरम्यान, दुसरीकडे रविना टंडनदेखील बॉलिवूडमध्ये आपले स्थान बनवण्यात यशस्वी झाली. पण या दोघांमध्ये एकदा एका अभिनेत्यामुळे खटका उडाला होता आणि प्रकरण थेट हा’णामा’रीवर आले होते. चला तर मग जाणून घेऊया कोण होता तो नशीबवान अभिनेता.
बॉलिवूड कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यमुळे. बऱ्याच वेळा चाहते आपला आवडता अभिनेता कोणाला डेट करत आहे किंवा त्याच्या रिलेशनशीप विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. तसेच कलाकरांमध्येही भांडण झाल्याचे आपण ऐकतो.
९०च्या दशकात अभिनेत्री करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यामध्ये देखील एका अभिनेत्यामुळे भांडण झाले होते. त्या दोघी एकमेकींसोबत काम करण्यासही तयार नसल्याचे म्हटले जात होते. करिश्मा आणि रवीना यांच्यामधील भांडणामुळे सेटवर वेगळे वातावरण असायाचे. करण जोहरच्या ‘कॉपी विथ करण’ या शोमध्ये कोरियोग्राफर फराह खानने याबाबत माहिती दिली होती.
करण जोहरने फराहला करिश्मा आणि रवीना यांच्यात झालेल्या भांडणाविषयी विचारले होते. तेव्हा फराह म्हणाली, ‘आतिश फील द फायर या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी करिश्मा आणि रवीना यांच्यासोबत एका गाण्यासाठी काम करत होते. दरम्यान त्या दोघींमध्ये भांडण सुरु झाले होते. गाण्याच्या चित्रीकरणासाठी त्यांनी विग घातले होते आणि त्यावरुन त्यांच्यामध्ये भांडण सुरु झाले. भांडण इतके टोकाला पोहोचले की त्या दोघींमध्ये मा’रामा’री सुरु झाली.’
करिश्मा आणि रवीना यांच्यामध्ये ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाच्या वेळी वाद सुरु झाल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी त्या दोघी एकमेकींशी बोलतही नव्हत्या. चित्रपटाच्या प्रमोशन वेळी देखील त्या एकत्र दिसल्या नसल्याचे म्हटले जाते. पण त्यांच्यामध्ये अभिनेता अजय देवगणमुळे भांडण झाले होते.
त्यावेळी करिश्मा कपूर आणि अजय देवगण हे रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांचा ‘जिगर’ हा चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतर त्यांनी ‘हलचल’, ‘गुंडाराज’, ‘संग्राम’ या चित्रपटांमध्ये काम केले. त्यापूर्वी अजय रवीनाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अजयमुळे दोघींमध्ये वाद झाल्याचे म्हटले जाते.