‘या’ अभिनेत्याने केली करणची पोलखोल ! से क्सचा आधार घेत करण जोहर करतो स्वतःचा शो हिट! कधी अभिनेत्रीची ब्रा तर कधी से क्स पोजिशन….

करण जोहरने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. देशातील एक उत्तम दिग्दर्शक म्हणून त्याला ओळखले जाते. मात्र केवळ एवढीच त्याची ओळख नाहीये त्याने अनेक वेळा आयफा आणि फिल्मफेअर सारखे अवॉर्ड शो देखील होस्ट केले आहेत.
परफेक्ट कॉमेडी टाइमिंग यामुळे करण जोहर खऱ्या अर्थाने एक उत्तम होस्ट देखील आहे. सोबतच तो अनेक रियालिटी शोचा जज देखील आहे. मध्यंतरी प्रदर्शित झालेल्या बॉम्बे वेलवेट या चित्रपटांमध्ये त्याने अभिनय देखील केला. अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणारा करण खऱ्या अर्थाने त्याच्या टॉक शोमुळे सर्वात जास्त चर्चेत आला असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही.
2004 मध्ये या शोचा सर्वात पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या टॉक शोचे सातवे पर्व सुरु आहे. अनेक दिग्गज सेलिब्रेटी या शोमध्ये बिनधास्त गप्पा मारतात आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वेगवेगळे खुलासे करतात. त्यामुळे हा शो चाहत्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरतो. या शो मधून आपल्या आवडत्या सेलिब्रेटीची एक वेगळी झलक बघायला मिळते.
यावेळी करण आपल्या बोलण्यात गुंतवून सेलिब्रिटींची चांगलीच फिरकी घेतो तर कधी कधी उलट देखील होते. अभिनेता अजय देवगन, अमीर खान, सलमान खान, अक्षय कुमार यांनी करणचीच फिरकी घेतल्याचे बघायला मिळाले होते. स्वतःच्या बोलण्यात चतुर असलेल्या करण जोहरची या शोमध्ये बोलती बंद झाल्याचे खूप कमी वेळा बघितले गेले आहे.
आणि अगदी असंच एका अभिनेत्याने शो हिट करण्यासाठी तू से’क्सचा आधार घेतो असं देखील म्हणलं होतं. त्यावेळी या वाक्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही मात्र शोचे नवीन पर्व सुरू झाल्यापासून शोच्या जुन्या क्लिप्स पुन्हा व्हायरल होत आहेत. त्यापैकीच ही क्लिप पुन्हा एकदा चांगलीच व्हायरल होत आहे.
पाचव्या सीझनमध्ये प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा देखील आला होता. यावेळी करण जोहरने खरंतर कपिल सोबत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली. त्यादरम्यान अचानकच सेक्सशी निगडित एक प्रश्न कपिलला विचारला. हा प्रश्न टाळण्यासाठी कपिल म्हणाला, ‘करण आपला शो चालवण्यासाठी से क्सचा आधार घेतो आणि त्यामुळेच सगळं काही से क्स कडेच वळतात.’
जेव्हा करणने कपिलला विचारले की, तो से क्स साठी काय करतो? यावर कपिलने अगदी मौन बाळगले. पण थोड्यावेळाने त्याने सांगितले से क्स बद्दल बोलणे ही करणची खासियत आहे. हे त्याच्या लक्षात आले आणि तो राजकीय अर्थव्यवस्थेविषयी चर्चा देखील सेक्स कडे नेऊ शकतो असं कपिल म्हणाला. कपिलच्या या विधानाने करणचे हावभाव बदलले.
करण स्वतः म्हणाला की से क्स हीच त्याची खासियत आहे. त्याच्या आईने देखील त्याला अनेकदा सांगितले आहे की, प्रत्येकालाच याबद्दल बोलणे किंवा प्रश्न विचारणे योग्य वाटत नाही. त्यामुळे करणे स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवायलाच हवे. करण म्हणाला की, कोणत्याही विषयाला तो अतिशय चातुर्याने से क्शुअल बनवू शकतो. पण आता तो से क्सवर जास्त न बोलता याचा प्रयत्न करेल असेही त्यांनी सांगितले.