…म्हणून धोनीने गुपचूप केले होते लग्न, पहा त्याच्या लग्नातील खास फोटो….

एम एस धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आपले सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. युवराज सिंह, जहीर खान, हरभजन सिंह, सचिन तेंडुलकर, विराट कोहली , गौतम गंभीर तर थोडक्यात काय संघातील प्रत्येक खेळाडूने ज्या जिद्दीने पूर्ण वर्ल्डकप २०११ मधील सर्व सामने खेळले होते ते खरंच कौतुकास्पद होते.
त्यामुळे २०११मध्ये धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताला विश्वविजेतेपद पटकावण्यात यश आले. म्हणून तर धोनी आणि भारतीयांचे जे नाते आहे ते कोणत्याही शब्दांत वर्णन करता येणार नाही. आपल्या देशामध्ये उत्तम आणि कौशल्यपूर्ण खेळाडूंची कमतरता आहे. आधी देखील कधीच नव्हती, आणि पुढे कधीही राहणार नाही हे सत्य आहे.
परंतु, धोनीसोबत प्रत्येक भारतीयांचे फक्त क्रिकेटचेच नाही तर मनाचे नाते जुळलेले आहे. धोनी आणि त्याचा खेळचं नाही तर, धोनीचे संपूर्ण आयुष्यच अगदी प्रेरणादायक आहे. एक अगदी सर्व-साधारण कुटुंबातील मुलगा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे ध्येय जेव्हा आपल्या आयुष्यात ठेवतो तेव्हा, संपूर्ण जग जिंकण्याची ताकत तो ठेवून असतो हे आपल्याला त्याच्याकडे पहिले कि लक्षात येते.
त्याच्या आयुष्याचा हा संघर्ष ‘एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामध्ये खूपच उत्तम पद्धतीने चित्रित करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये धोनी आणि साक्षीची लव्ह-स्टोरी देखील खूपच सुंदर पद्धतीने दाखवण्यात आली आहे. धोनी आणि साक्षी लग्नाच्या आधी काही वर्ष एकमेकांसोबत नात्यामध्ये होते.
मात्र धोनीने साक्षीसोबतच आपलं नातं गुलदस्त्यातच ठेवलं होत. त्यापूर्वी त्याच अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं होत. दीपिका आणि महेंद्रसिंग धोनीला लंच करताना स्पॉट केलं गेलं होत. शिवाय काही दाक्षिणात्य अभिनेत्रींसोबतसुद्धा धोनीच्या नावाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच अचानक ४ जुलै २०१० रोजी धोनीच्या आणि साक्षीच्या लग्नाचे फोटोज समोर आले.
हे फोटो समोर येताच अनेकांना मोठा सुखद धक्का बसला. ग्लॅमर जगातील सुंदरीसोबत धोनीचे नाव जोडले जात असताना अचानक धोनीने एका साधारण मुलीसोबत लग्न केले, याचे अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र सर्वान साधारण वाटणारी साक्षी नक्कीच धोनीसाठी साधारण नव्हती. धोनी आणि साक्षी दोघेही एकाच शाळेत होते.
दोघे एकेमकांना लहानपणापासून ओळखत होते. मात्र काही वर्षानंतर साक्षी आपल्या कुटुंबासह डेहराडून ला शिफ्ट झाली आणि त्यांचा संपर्क सुटला. त्यानंतर जेव्हा धोनी सामन्यासाठी कोलकाता येथे ताज हॉटेलमध्ये थांबला होता तिथे पुन्हा एकदा साक्षी आणि धोनीची ओळख झाली. त्यावेळी साक्षी इंटर्न होती आणि धोनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार.
पुन्हा संपर्कात आल्यानंतर काही महिन्यातच दोघांनी एकमेकांनी डेट करण्यास सुरुवात केली. २००८ मध्ये धोनीच्या बर्थडे पार्टीला देखील साक्षीने हजेरी लावली होती. मात्र, धोनीचे इतर अभिनेत्रींसोबत जोडले जात असणारे नाव यामुळे साक्षीला प्रचंड त्रास होऊ लागला आणि अचानक धोनीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
त्याच्या लग्नात कुटुंबियांसह काही बॉलीवूड स्टार्स आणि ६ फेब्रुवारी २०१५मध्ये दोघांच्या आयुष्यात झिवा आली. साक्षीला धोनीचे लेडी लक देखील बोलले जाते. कारण तिच्यासोबत लग्न केल्यानंतरच त्याने यशाची नवीन शिखर गाठली. आज धोनीने जरी क्रिकेट मधून संन्यास घेतला असला, तरी अनेक तरुणांसाठी तो प्रेरणा बनला आहे.