‘मौनी रॉय’ला लागली उर्फीची हवा, फक्त बिकिनी घालून रस्त्यावर फिरताना दिसली..पहा video

‘मौनी रॉय’ला लागली उर्फीची हवा, फक्त बिकिनी घालून रस्त्यावर फिरताना दिसली..पहा video

माघील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाने चांगलीच धूम केली होती. यामध्ये अभिनेत्री मौनी रॉयच्या अभिनयाचं देखील चांगलंच कौतुक करण्यात आलं. मौनीने चित्रपटामध्ये जुनूनची भूमिका साकारली होती. तिच्या या अभिनयाने चाहत्यांना सुखद धक्का दिला.

त्यानंतर मात्र मौनी फारशी कुठं दिसली नाही. सध्या मौनीकडे फारस काम नाहीये. मात्र असं असलं तरीही मौनी सोशल मीडियावर मात्र सक्रिय असते. आपल्या इंस्टाग्राम वर मौनी नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काही तरी हटके शेअर करतच असते. अभिनेत्री मौनी रॉय कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. काही ना काही भन्नाट करत ती चर्चा रंगवत असते. आता पुन्हा एकदा असंच काही मौनी रॉयने केलं आहे. मौनी रॉय सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. अलीकडेच मौनी मियामी बीचवर बिकिनी घालून किलर स्टाइलमध्ये पोज देताना दिसली.

मौनीने तिच्या बिकिनी अवताराने चाहत्यांची झोप उडवली. तिच्या अति मादक अशा लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे. सुट्टीचा आनंद घेत मौनी आता सगळंच काही विसरली आहे. त्यामुळेच आता तिने जे केलं आहे, ते बघून सगळेच चकित झाले आहेत. मौनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये मौनी रॉय ब्रॅलेट घातलेली दिसत आहे. मौनीने ब्रॅलेटसह पारदर्शक स्कर्ट कॅरी केला आहे. त्याचवेळी, मौनी उघडपणे ब्रॅलेट परिधान करून रस्त्यावर नाचताना दिसत आहे. त्याच्यासोबत एक विदेशी महिलाही नाचताना दिसत आहे.

मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती परदेशातील रस्त्यांवर बिकिनीमध्ये फिरताना आणि मस्ती करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडियोवर अभिनेत्री दिशा पटानी कमेंट केली आहे. दिशाला मौनचा हा व्हिडियो खूप आवडला आहे.

तर दुसरीकडे व्हिडीओ पाहून लोकांची डोकी फिरू लागली असून अनेकांनी शिवीगाळ देखील केली आहे. तिच्या या व्हिडियोवर कमेंट करत एक युजर म्हणाला, ‘देशाची संस्कृती काय शिकवते? आणि तुम्ही काय वागत?’ दुसर्‍या युजरने लिहिले, ‘मौनीची चूक नाही, परदेशात गेल्यावर प्रत्येकजण नग्न होतो.’

अजून एका युजरने लिहले कि, ‘मला एक क्षण वाटले उर्फी जावेदच आहे.’ तर काहींनी चिडून रागात लिहले आहे की, ‘तुम्ही काय परिधान करून सार्वजनिक ठिकाणी वेड्यासारखे फिरत आहात.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12