मोहब्बते चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री आठवते का ? पहा आता दिसते अधिकच हॉट आणि भरगच्च..

९०च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी बॉलीवूडमध्ये खास एंट्री घेतली होती. आजदेखील त्यापैकी अनेक अभिनेत्री मनोरंजन सृष्टीमध्ये सक्रिय आहेत. तर काही अभिनेत्रींना आज बॉलीवूड विसरले आहे. बॉलीवूडमध्ये यश राज फिल्म्स मध्ये काम करणे कोणत्याही कलाकारासाठी एक सुवर्ण संधी म्हणून बघितलं जात.
खास करून अभिनेत्रींसाठी, यश राज फिल्म्स मध्ये काम करणे यशाच एक शिखर समजलं जात असे. आज देखील कित्येक अभिनेत्री या प्रोडक्शन कंपनी सोबत काम करण्यासाठी धडपडत असतात. तर, दुसरीकडे काही अभिनेत्रींनी थेट यश राज फिल्म्सच्या बॅनर मधूनच या बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली.
२००० मध्ये शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचा मोहबत्ते हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय देखील या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटामुळे ऐश्वर्या रायच्या करियरला एक खास वळण मिळालं. केवळ ऐश्वर्याच नाही तर इतर काही अभिनेत्रींनी देखील या चित्रपटामधून आपले कौशल्य दाखवले.
विशेष म्हणजे या चित्रपटातून तीन अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीने याच चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली. तिच्यासोबतच अजून दोन अभिनेत्रींनी पदार्पण केले. याच अभिनेत्रींपैकी एका अभिनेत्रीने नुकतंच सोशल मीडियावर आपला एक व्हिडियो शेअर केला आहे.
या व्हिडियोमध्ये अभिनेत्रीने हॉटनेसचा तडका लगावला आहे. हॉटनेस म्हणलं की, हि अभिनेत्री अजून कोणी नसून किम शर्मा आहे. मात्र यावेळी किम शर्मा नाही तर दुसऱ्याच अभिनेत्रीने आपल्या बोल्ड अवताराने चाहत्यांना चकित केलं आहे. मोहबत्ते चित्रपटामध्ये साधी आणि सोज्वळ भूमिकेत झळकलेली प्रीती झाँगियानीने तिच्या सेक्सी लूकने सर्वाना सुखद धक्का दिला आहे.
१९९९ मध्ये थम्मडू या पवन कल्याण यांच्या चित्रपटातून मनोरंजन सृष्टीमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे त्यानंतर लगेच प्रीतीने मोहबत्ते सारख्या मोठ्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ग्लॅमर आणि बोल्डनेसने परिपूर्ण मोहब्बतें चित्रपटामध्ये प्रीती झंगियानीने आपल्या शांत आणि सोज्वळ रूपात अनेकांची मन जिंकली होती.
मोहब्बतें चित्रपटतर सुपरहिट ठरला. त्यामधून प्रीतीला मोठा चाहतावर्ग देखील मिळाला. मात्र तिला आपण स्टारडम टिकवता आलं नाही, आणि मोहब्बतें नंतर ती फारशी दिसली नाही. आता पुन्हा एकदा प्रीती चर्चेत आली आहे. बॉलीवूड रिपोर्टर विरल भयानीने प्रीतीचा एक व्हिडियो शेअर केला आहे.
यामध्ये मोनोक्रोम प्रिंट मधील बिकिनीमध्ये प्रीती स्वीमींग पूलमध्ये आहे. यावेळी प्रितीने तिच्या बोल्ड अवताराने सर्वांनाच चकित केलं आहे. तिचा हा अंदाज बघून चाहते भलतेच खुश झाले आहेत. वयाच्या ४२व्या वर्षी देखील प्रीती खूप जास्त फिट आणि सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी हा व्हिडियो चांगलाच शेअर करत लाईक केलं आहे.