‘मुलगा ‘हिरो’ झाला म्हणून मी थोडाच म्हातारा झालोय, “मै अभी जवान हु !” म्हणत जॅकी श्रॉफने ‘त्या’ कि’सिंग सीनवर दिली ही प्रतिक्रिया…

अभिनेत्याचा मुलगा अभिनेता ही, बॉलीवूडची एक परंपराच बनली आहे. आज बॉलीवूडमध्ये अनेक मोठाल्या कलाकारांच्या मुलांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यापैकी काहींना यश मिळाले तर काही अजूनही यश मिळवण्यासाठी धडपड करतच आहेत. बॉलीवूडमध्ये हे खूप जुने सत्र आहे. अनेकांचे बॉलीवूडमध्ये येऊन अभिनेता बनायची इच्छा असते.
मात्र सहाजिकच त्यासाठी काही तरी पार्श्वभूमी लागते. ती नसेल तर यश मिळायला अनेक वर्ष जातात, आणि काहींच्या वाट्याला ते येत देखील नाही. त्यामुळेच सुरुवातीपासून प्रत्येक क्षेत्रात सुरु असलेल्या घराणेशाहीचा, आता बॉलीवूडमध्ये मोठा मुद्दा बनत आहे. असं नाहीये की, सर्वच कलाकरांना अभिनय येत नाही.
राज कपूर, रणबीर कपूर, सलमान खान, हृतिक रोशन, विकी कौशल, यासारख्या काही अभिनेत्यांचे कौशल्य नक्कीच वाखानण्याजोगे आहे. मात्र, काही कलाकारांकडे साहजिकच तेवढे कौशल्य नसताना देखील ते आज एक स्टार आहेत. अभिनेता टायगर श्रॉफ सुरुवातीपासूनच चर्चेत होता. आपल्या वेगळ्या नावामुळे, त्याने चांगलीच प्रसिद्धी कमावली होती. मात्र जेव्हा सिनेमामध्ये पदार्पण करण्याची बाब आली त्याने प्रथम स्वतःवर भरपूर काम केले.
हृतिक रोशन कडून डान्सचे धडे घेतले, बॉडी बनवली, अनुपम खेर यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले आणि त्यानंतर हिरोपंथी या सिनेमामधून पदार्पण केले. मुळात या सिनेमाचे कथानक उत्तम होते आणि त्यात, टायगर आणि कृती सेननच्या उत्तम अभिनयामुळे हा सिनेमा हिट ठरला. एक ऍक्शन हिरो म्हणून टायगरने बॉलीवूडमध्ये आपली ओळख बनवली आहे.
बाघी सिनेमामधून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. टायगरचा आज मोठा चाहतावर्ग आहे. त्याने खरोखर आपल्या टॅलेंटच्या बळावर, बॉलीवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. ८०-९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा तो मुलगा आहे. जॅकी यांनी आपल्या काळात अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केले आहे.
त्यांचा फॅनफोलविंग आजदेखील मोठा आहे. मात्र काही दिवसांपासून त्यांनी अभिनयापासून अंतर केले होते. त्यांना हवी तशी भूमिका मिळत नव्हती, तर कुठे कथानकांमध्ये दम नव्हता म्हणून त्यांनी काम नाकारले. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या फॅन्सला त्यांना बघता येणार आहे. लवकरच जॅकी च ‘द इंटरव्यू: नाइट ऑफ २६/११’ या सिनेमामध्ये एका पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहेत.
याच सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान त्यांना यामधील त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या सिनेमामध्ये त्यांनी एक कि’सिं’ग सि’न दिला आहे. एकीकडे टायगर तरुण अभिनेना ऍक्शन सिन करतो, तर दुसरीकडे त्याचे वडील रो’मँ’टिक कि’सिं’ग सिन करतात, हे थोडं वेगळं नाही का ? त्यावर जॅकी श्रॉफ यांनी आपल्या खास शैलीमध्ये प्रतिक्रिया दिली, ‘मी कि’सिं’ग सि’न का नाही देऊ शकत?
माझा मुलगा अभिनेता आहे त्याचा आणि माझ्या कामाचा काय सं’बं’ध आहे? तो त्याच काम करतो मी माझं काम करतो, यात संकोच कसला? अभी तो मै जवान हुं,’ असं म्हणत त्यांनी पत्रकाराची फिरकी देखील घेत पुढे ते बोलले, ‘खरोखर, हा सीन करताना मला अजिबात संकोच वाटला नाही. माझा मुलगा तरुण झालाय, एक उत्कृष्ट अभिनेता आहे. हा विचार करून मी वेगळ्या आणि खास भूमिका करणं सोडू तर शकत नाही ना?
आम्ही एकमेकांचे स्पर्धक आहोत याचं मला खास कौतुक आणि अभिमान आहे. त्याने इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं आहे आणि स्वत:च स्थान निर्माण केलंय. आता मला टायगर श्रॉफचे वडील म्हणून ओळखलं जातं ही गोष्टचं निराळी आहे. मला त्याचा खूप आनंद होतो. मला त्याच्यापासून प्रेरणा मिळते आणि त्यालाही आपले वडील आजही उत्सूर्तपणे काम करतात याचा अभिमान आहे.’