मुन्नाभाई MBBS मधला स्वामी आठवतो का? २० वर्षानंतर दिसतो असा की बाजूने गेला तरी ओळखू येणार नाही..

मुन्नाभाई MBBS मधला स्वामी आठवतो का? २० वर्षानंतर दिसतो असा की बाजूने गेला तरी ओळखू येणार नाही..

२००३ मध्ये प्रदर्शित झालेला मुन्नाभाई MBBS सिनेमा आज देखील अनेकांच्या आवडीच्या सिनेमापैकी एक आहे. डॉक्टरी पेशाला एका वेगळ्या आणि अनोख्या रूपामध्ये राजू हिरानी यांनी दाखवले. हसण्याचे महत्व सांगनाऱ्या या सिनेमाने, सगळ्याना खळखळून हसवले.

आनंदी आणि हसत-खेळत राहील तर कोणत्याही सं’कटावर मात करण्याची ऊर्जा मिळते, त्यामुळे शक्य तितके आनंदी रहा आणि एकमेकांना प्रेम द्या असा मोलाचा संदेश या सिनेमाने सगळ्यांना दिला. हा सिनेमा बघताना सर्वच जण अगदी गुंग होऊन जातात. सिनेमाचे नाव घेताच, मुन्नाभाई आणि सर्किट सोबत डॉ रस्ताना समोर येतातच.

मात्र त्याचबरोबर, स्वामी आणि मुन्नाभाईच्या कॉलेजमधील मंडळी देखील समोर उभी ठाकतात. अंगाने सडपातळ, डोळ्यावर भला-मोठा चष्मा, अभ्यासू आणि तेवढाच जास्त हुशार स्वामीची भूमिका खुर्शीद लॉयर या अभिनेत्याने साकारली होती. काहीच दिवसात सध्या-भोळ्या स्वामीचा मुन्नाभाईचा अगदी खास मित्र बनला, आणि खुर्शीदला तीच ओळख मिळाली.

मात्र खुर्शीदने या सिनेमाच्या बऱ्याच आधी बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते. अनेक कॉमेडी सिनेमामध्ये त्याने छोटे मोठे पात्र रेखाटले होते, मात्र स्वामी म्हणूनच त्याला खरी ओळख मिळाली. परफेक्ट कॉमेडी टायमिंग आणि हटके अभिनय शैली यामुळे त्यानंतर खुर्शीद, प्यारे मोहन, अजब प्रेम की गजब कहाणी, हरी पुट्टर, डबल धमाल, गिप्पी, फुद्दू सारख्या सिनेमात देखील झळकला होता.

मिसेस पम्मी प्यारेलाल आणि इतर काही कॉमेडी सीरियलमध्ये देखील त्यानं काम केलं. ढिंचॅक एन्टरप्रायजेस या मराठी सिनेमात देखील खुर्शीदने काम केले होते. रिडियो जॉकी, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असे अनेक प्रतिभा खुर्शीदकडे आहेत. त्यामुळे मधल्या काळात त्यांनी, अभिनयापासून ब्रेक घेतला होता.

दरम्यान आता तो पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. द ग्रेट इंडियन म’र्डर या वेब- सीरिजमधून आता पुन्हा कमबॅक करत आहे. व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इन्स्टा पेजवरून नुकतंच खुर्शीदचे नवीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो बघून त्याला ओळखने देखील शक्य नाहीये.

त्याचे हे फोटो बघून चाहते देखील आश्चर्य च’कित झाले आहेत. खुर्शीदला त्याच्या या नवीन फोटोंमध्ये बघून, ‘अरे हा तर मुन्नाभाईचा स्वामी. किती बदलला,ओळखु येत नाही,’ असं काही युजर्सने कमेंट केलं आहे.

डोक्यावरचे जवळपास सर्व केस गेलेले, उतारव्याच्या छटा आणि दाढीमध्ये काही पांढरे केस यामुळे खुर्शीद लॉयर सुरुवातीपेक्षा अगदी वेगळा दिसत आहे. हॉटस्टार वरील तिगमांशू धुलिया यांच्या ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ या पॉलिटिकल थ्रिलर वेब- सिरीजची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. यामध्ये खुर्शीदला बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.