मुंबई पो’लिसांवरही पुष्पाची जादू, ‘श्रीविल्ली’ गाण्याचं मुंबई पो’लीस व्हर्जन पाहून कराल कौतुक..

मुंबई पो’लिसांवरही पुष्पाची जादू, ‘श्रीविल्ली’ गाण्याचं मुंबई पो’लीस व्हर्जन पाहून कराल कौतुक..

पुष्पा सिनेमाला प्रदर्शित होऊन आता तीन महिने उलटून गेले आहेत. मात्र असं असलं तरीही अद्याप या सिनेमाची क्रेझ कायम आहे. अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा सिनेमाने अक्षरशः कमाल केली. चाहत्यांनी तर या सिनेमाला डोक्यावरचं उचलून घेतलं असं म्हणलं तरीचुकीच ठरणार नाही.

या सिनेमाचे डायलॉग आणि गाणी अजून देखील चाहत्यांच्या मनात आपली जागा बनवून आहेत. इंस्टाग्राम वर तर या सिनेमाच्या डायलॉग आणि गाण्याच्या रिल्सचा आकडा लाखोंच्या घरात पोहोचला आहे. यावरूनच पुष्पा सिनेमाची जादू अद्याप कायम आहे हेच समजते. सर्वसाधारण लोकांपासून खुद्द उदयनराजेंना देखील पुष्पाचे वेड लागले.

उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना खास पुष्पा स्टाईलमध्ये डायलॉग बोलताना बघतील गेले. आणि आता पुन्हा एकदा या सिनेमाने काही खास व्यक्तींना वेड लावल्याच दिसत आहे. मुंबई पो’लिसांना आता पुष्पाच वेडं लागलं आहे.

कायम मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असणारे मुंबई पो’लीस अधून मधून आणि जसा वेळ मिळेल तस आपल्या आवडत्या कलेला जोपासण्याचा प्रयत्न तर करतच असतात. कधी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचा भन्नाट डान्स बघायला मिळतो. तर कधी पो’लीस अधिकाऱ्यांचे मधुर सूर कानी पडतात. आजवर तुम्ही श्रीवल्ली गाण्याचं अनेक वेगवेगळे आणि हटके व्हर्जन पहिले असतील.

मात्र आता जे व्हर्जन समोर आले आहे, त्यानं मनाला एक वेगळीच शांती आणि आनंद मिळतो. मुंबई पोलिसांच्या बँड खाकी स्टुडिओने ‘पुष्पा: द राइज’ सिनेमातील, लोकप्रिय ठरलेलं श्रीवल्ली गाण आपल्या अंदाजामध्ये रीक्रीयेट केल. आणि सध्या हाच व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

या व्हिडियोमध्ये बघायला मिळतं की, खाकी स्टुडिओचे सदस्य ‘श्रीवल्ली’ हे गाणं सॅक्सोफोन, ट्रम्पेट, बासरी आणि इतर वाद्यांसह वाजवत आहेत. ‘खाकी स्टूडियो रुकेगा नहीं!’ असं कॅप्शन टाकत मुंबई पोलिसांनी हा व्हिडियो शेअर केला आहे. पुढे त्यात लिहलं आहे की, मुंबईकरांना ‘श्रीवल्ली’च्या सुरावर डोलताना आम्ही पाहिलं.

त्यांचा आनंद बघून आम्ही देखील त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला! या व्हिडियोवर नेटिझन्सने अक्षरशः लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावच केला आहे. नेटिझन्सने या व्हिडियोवर खास कमेंट केल्या आहे. काहीच तासांमध्ये या व्हिडियोला हजारो व्युव्हज आले. ‘मुंबई पोलीस तुस्सी ग्रेट हो,’ असं एका युजरने कमेंट केली आहे. तर एक युजर म्हणतो, ‘पुष्पा साठीचे प्रेम कोविड सारखं पसरतच आहे.’

केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रच नाही तर, देशाच्या वेगवगेळ्या भागातून या व्हिडियोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. यापूर्वी, खाकी स्टुडिओने लता मंगेशकर यांच्या ‘ए मेरे वतन के लोगों’ या गाण्याचं व्हर्जन प्रदर्शित केलं होत. सोबतच, ‘मनी हाईस्ट’ या गाण्याचे ‘बेला चाओ’ या गाण्याला तर खास लोकप्रियता मिळाली होती.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.