मालिकेत संस्कारी बहूचा देखावा करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात सोडली लाज, बिकीनी घालून नावऱ्यासोबत शेअर केले भलेतच फोटो…

छोट्या पडद्यावर सुसंस्कृत सुनेची भूमिका करून अनेक अभिनेत्री रातोरात प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाल्या. या मालिकांमध्ये, या अभिनेत्रीनी परिपूर्ण सून बनण्यासाठी त्या सर्व गोष्टी केल्या. परंतु, वास्तविक जीवनात क्वचितच अशा सर्व गोष्टी पाहायला मिळतात. मात्र या अभिनेत्री सतत शालीनता आणि सभ्यता, अगदी साधं प्रतिमा दाखवत कंटाळतात.

आणि मग याच अभिनेत्रीचे बोल्ड अवतार पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा एका सुसंस्कृत सुनेने शालीनतेचा झगा उतरवून इतका बोल्ड लूक दाखवला आहे की, या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री बिकिनीमध्ये पोज देताना दिसली तर कधी पतीला लिपलॉक करताना दिसली.

विशेष म्हणजे हे फोटो अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘पंड्या स्टोअर’मध्ये धाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शायनी आहे.

शायनीने २०१३ साली हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ‘सरस्वतीचंद्र’ या टीव्ही शोमधून पदार्पण केले. शायनी दोशी ‘सरस्वतीचंद्र’मध्ये कुसुमच्या भूमिकेत दिसली होती. तिच्यासोबत गौतम रोडे आणि जेनिफर विंगेट यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. शायनी नंतर ‘सरोजिनी: एक नई पहल’, ‘बहू हमारी रजनीकांत’, ‘जमाई राजा’, ‘लाल इश्क’ आणि ‘श्रीमद भागवत पुराण’मध्ये दिसली.

15 जुलै 2021 रोजी तिने प्रियकर लवेश खैरजैनीशी लग्न केले. सध्या शायनी दोशी ‘पंड्या स्टोअर’ या मालिकेत घरातील मोठ्या सुनेची भूमिका करत आहे. धाराला मुलं नसून तिला आई व्हायचं आहे, असं दाखवण्यात आलं आहे. शायनी दोशीने सोशल मीडियावर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

ज्यामध्ये ती पर्पल कलरची प्रिंटेड बिकिनी घालून कॅमेऱ्यात किलर पोज देताना दिसत आहे. याशिवाय शायनीने आणखी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री पतीसोबत खुलेआम अगदी बिनधास्तपणे लिपलॉक करताना दिसली. या फोटोमध्ये धारा म्हणजेच शायनीने रिव्हिलिंग ड्रेस घातलेला दिसत होता, तर तिचा नवरा शर्टलेस लूकमध्ये दिसत होता.

धाराने या लिपलॉकचा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जो पाहता पाहता व्हायरल होत आहे. दरम्यान, अशा प्रकारचा बोल्ड फोटो शेअर करण्याची ही शायनीची पहिलीच वेळ नाही. याआधीही टीव्हीच्या या सुसंस्कृत सुनेने अनेकवेळा बिकिनी ते रिव्हिलिंग ड्रेसचे फोटो शेअर करून तिची प्रतिमा मोडीत काढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12