मानसी नाईक नंतर मराठी अभिनेता ‘सिद्धार्थ’ चांदेकरने ‘या’ सुंदर अभिनेत्रीसोबत आज उरकून घेतले ‘लग्न’…

मानसी नाईक नंतर मराठी अभिनेता ‘सिद्धार्थ’ चांदेकरने ‘या’ सुंदर अभिनेत्रीसोबत आज उरकून घेतले ‘लग्न’…

नुकतेच मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक विवाह बंधनात अडकली आहेत. त्यातच आता स्टार प्रवाह वर सध्या सुरू असलेली आणि सर्वांची आवडती मालिका ‘सांग तू आहेस का’ या मालिकेतील मुख्य नायक स्वराज म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर आज लग्नाच्या बंधनात अडकला आहे.

मराठी क्षेत्रातील अभिनेत्री मिताली मयेकर हिच्यासोबत सिद्धार्थचा विवाह झालेला आहे. दोघेही 2 वर्षांपासून रि’लेशन मध्ये होते. मराठी सिनेसृष्टी मधील प्रसिद्ध क्युट कपल सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांनी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज विवाह केला आहेत.

पुण्यात रितिरिवाजप्रमाणे आणि नातेवाईक, आप्तेस्ट तसेच मराठी कलाविश्वातील कलाकारांचे साक्षीने त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिद्धार्थ-मितालीच्या मेहंदी, संगीत, हळदीचे फोटोज, व्हिडिओत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होते. आणि अखेर आज हे दोघेही कुटुंबिय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नाचे बंधनात बांधले गेले आहे.

या खास क्षणांचे सुंदर फोटो देखील समोर आले आहेत. इन्स्टाग्राम चे अकाऊंट वरून सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नसोहळ्याचे फोटोज शेयर केले गेले आहे. सिद्धार्थ आणि मिताली यांचा विवाह पुण्यातील ढेपेवाडा येथे पार पडला. लग्नात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती आणि सिद्धार्थने रॉयल ब्लू रंगाचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचे धोतर परिधान केले होते.

या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी दिली होती. या लग्नाला अभिनेत्री अभिज्ञा भावे तिच्या पतीसह हजर होती. तर पूजा सावंत, भूषण प्रधान हे देखील हजर होते. तसेच लग्नापूर्वी सिद्धार्थ आणि मितालीच्या केवळनाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धूम मचावली होती.

त्यांच्या हळदीचे आणि मेहंदीचे, व्हिडिओज देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाईन्स च्या दिवशी दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर जाहीर केली होती. त्यानंतर सिद्धार्थ आणि मिताली यांचा 24 जानेवारी 2019 रोजी मुंबईत साखरपुडा झाला होता.

त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी दोघांनी लग्न करून सात फेरे घेत आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. दरम्यान, मिताली झी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक गं..’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर सिद्धार्थ चांदेकर स्टार प्रवाह वरील ‘सांग तू आहे का..’ या हॉरर थ्रीलर या मालिकेतून मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12