मानसी नाईकनंतर अमृता खानविलकर आणि हिमांशूमध्ये बिनसलं, सोशल मीडियावरून दोघांनी दिले संकेत…

मनोरंजन सृष्टी पुन्हा एकदा लग्नसराईच्या भरभरून आली आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधे देखील लग्नसराई सूर झाली आहे. अनेक सेलिब्रिटीज विवाह बंधनात अडकत आहेत. वनिता खरात पाठोपाठ कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील नुकतंच लग्नबेडीत अडकले आहेत.
नुकतंच त्यांनी आपल्या मित्र परिवारासाठी रिसेप्शन पार्टीचं देखील आयोजन केलं होत. आता दृश्यमचा दिग्दर्शक अभिषेक पाठकने देखील अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय सोबत लग्न केलं आहे. एकीकडे सिनेसृष्टी या जोडप्याच्या एकत्र येण्याचा आनंद साजरा करत आहे. चाहते या सर्वच नवदांपत्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
तर दुसरीकडे काही सेलेब्रिटी वेगळे होत आहेत. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने असेच काहीसे संकेत देत, तिच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राकडे सिनेसृष्टीमधे अतिशय क्युट आणि सुंदर कपल म्हणून पाहिले जाते. त्यांनी अनेकवेळा उघडपणे आपल्या नात्यात आलेल्या अडचणी आणि समस्यांबद्दल सांगितले आहे.
त्यामुळे या बिनधास्त जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. काही महिन्यांपूर्वीच अमृताने हिमांशु आणि आपल्या मित्रमंडळींसोबत जोरदार वाढदिवस साजरा केला होता. या पार्टीची सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली होती. अमृता आणि हिमांशूचे प्रेम बघत अनेकांनी त्यांना परफेक्ट कपल म्हणत त्यांचं कौतुक देखील केलं होत.
मात्र आता एक थक्क करणारी बातमी समोर आलाय आहे. अमृताने आपल्याच नवऱ्याला म्हणजेच हिमांशुला सोशल मीडियावरून ब्लॉक केले आहे. त्यामुळे त्यांच्यात सगळं आलबेल आहे की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्लॅनेट मराठीवरील ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॅाक शोमध्ये याबद्दलचा खुलासा खुद्द अमृताने केला आहे.
यापूर्वी अमृताने अनेकदा हिमांशुला ब्लॉक आणि अनफॉलो केले आहे. मात्र यावेळी हिमांशुने देखील अमृताला अनफॉलो केले आहे. इतकं टोकाला जाण्याच कारण काय, असा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. खरं तर त्यांच्यात नेमकं काय घडलं आणि आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे का, याबद्दल चाहत्यांमध्ये प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, ‘पटलं तर घ्या विथ जयंती’मध्ये अमृताने अनेक गोष्टी गंमतीदार किस्से, खटकणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत. यावेळी, अमृताने माझ्या पप्पांनी मला आतापर्यंत डान्स करताना बघितले नसल्याची खंत व्यक्त केली आहे. या गप्पाटप्पांमध्ये दिग्दर्शक ओम राऊतही सहभागी झाला आहे. आणि यावेळी त्याने अमृता आणि त्याच्या नात्याचं सत्य सांगितलं आहे. ते दोघे एकमेकांचे ‘बर्गर बडीज’ असल्याचे त्याने सांगितले.