‘चंद्रमुखी’ वरून अमृता आणि मानसीमध्ये बिनसलं! मानसी म्हणाली; ‘मी भूमिका सोडली म्हणून..’, तर उत्तर देत अमृता म्हणली; ‘मला फरक पडत नाही कारण..’

नटरंग या चित्रपटामध्ये वाजले कि बारा लावणीमधून घराघरात पोहोचलेल्या अमृता खानविलकरला आज कोण ओळखत नाही? अमृताने मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीमधे देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता खानविलकरने एकाहून एक खास भूमिका साकारल्या आहेत.
मात्र माघील वर्षी आलेल्या चंद्रमुखी सिनेमाची सगळीकडेच चांगली चर्चा रंगली. चंद्रमुखी या चित्रपटांमध्ये तिला भरभरून प्रतिसाद मिळाला. चित्रपटामध्ये अमृताने कलावंतीन ची भूमिका साकारली आहे. यामधील तिच्यातील दिलफेक अदांवरती चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.
दमदार अभिनय, साजेस नृत्य आणि सोबतीला अमृताच्या भावनांना थेट स्पर्श करणारा अभिनय, यामुळे चंद्रमुखी नाव घेतलं की आता तिचाच चेहरा समोर येतो. या भूमिकेत इतर कोणी असू शकत असा विचार देखील आता कोणी करूच शकत नाही. मात्र एका अभिनेत्रीने आपण चंद्रमुखी बनणार असल्याचा दावा केला होता.
रिक्षावाला गर्ल अभिनेत्री मानसी नाईकने याबद्दल एक दावा केला होता. याबद्दल आता अमृताने मौन सोडलं आहे. नुकतंच अमृताने प्लॅनेट मराठीवरील ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॅाक शोमध्ये हजेरी लावली. ‘पटलं तर घ्या विथ जयंती’मध्ये अमृताने अनेक गोष्टी गंमतीदार किस्से, खटकणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत.
यावेळी तिने आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टीबद्दल खुलासा केला आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील अमृताने काही खुलासे केले आहेत. याचदरम्यान तिला मानसी नाईकच्या त्या दाव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ‘चंद्रमुखी प्रदर्शित झाल्यानंतर यशाकडे वाटचाल करत असताना, मानसी नाईक म्हणाली होती की चंद्रमुखीसाठी आधी मला विचारण्यात आलं होत.
पण मी नाही म्हणाले आणि म्हणून अमृताला चान्स मिळाला. यावर तू काय म्हणशील?’ असा प्रश्न अमृताला विचारण्यात आला. त्यावेळी अमृता म्हणाली, ‘फिल्म इंडस्ट्रीत असं कायमच घडतं. चंद्रमुखी हा विषय खुला होता. सिनेमाचे राईट्स दोन वर्षांपूर्वी अक्षय बर्दापूरकरने विकत घेतले. त्याआधी अनेक वर्ष अनेक लोक जाऊन विश्वास पाटील यांना सतत विचारणा करत होते.
मानसीबरोबर माझं काहीही बोलणं झालेलं नाही. पण असंही असू शकतं की कोणीतरी हा प्रोजेक्ट करत असावा आणि तिला त्यासाठी विचारणा केली असावी.पण त्यात काहीही गैर नाही. मला अशा अनेक चित्रपटांसाठी विचारणा करण्यात आली. पण त्यानंतर पुढे त्यात कोणीतरी वेगळीच अभिनेत्री दिसली.’ यातच ती पुढे म्हणाली, ‘प्रियांका चोप्राचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवते.
माझ्या आधी कोणाला विचारलं गेलंय किंवा नाही गेलंय, याने मला काहीही फरक पडत नाही. मी ते पात्र करते हे तेव्हाच ठरतं, जेव्हा मी त्या चित्रपटाच्या सेटवर जाते. मी त्या सेटवर गेले आणि ती भूमिका केली. जेव्हा प्रसाद ओक माझ्याकडे ‘चंद्रमुखी’ घेऊन आला, तेव्हा त्याने मला माझी ‘चंद्रमुखी’ मात्र तूच आहेस असं सांगितलं होतं आणि मी त्याला होकार दिला.’