माझी तुझी रेशीमगाठ मालिका घेणार निरोप, शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर भावुक पोस्ट करत प्रार्थना म्हणाली….

प्रेमकथा सगळ्यांनाच आपल्याकडे आकर्षित करतात. खास करून त्या प्रेमकथांमध्ये काही नावीन्य असेल तर, त्यामध्ये पुढे काय होणार हा जाणून घेतांसाठी नेहमीच सर्वजण उत्सुक असतात. अशा अनेक प्रेमकथा आपल्याला छोट्या आणि मोठ्या पडद्यावर बघायला मिळतच असतात.
आपण देखील या हटके प्रेमकथा बघून त्यात गुंग होऊन जातो. काही लव्हस्टोरीजमध्ये छोट्या मुलांचे पात्र एक महत्वपूर्ण भूमिका साकारत असत. आणि अशा लव्हस्टोरीजला तर प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळते. माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका अल्पावधीच चांगलीच लोकप्रिय ठरली. मालिका कायमच टीआरपीच्या चढाओढीत आपलं एक स्थान कायम ठेवून असते.
यश आणि नेहाची प्रेमकहाणी आणि सोबतीला परीचा निरागसपणा यामुळे या मालिकेचा वेगळा असा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेतील चिमुरडीने म्हणजेच परीने सगळ्यांची मन जिंकली. या मालिकेला लोकप्रिय ठरवण्यात परीचे पात्र खूप महत्वाचे आहे. तिच्यामुळेच यश आणि नेहाच्या लव्हस्टोरीला वेगळेपण बघायला मिळाले.
यश आणि नेहाच्या लग्नानंतर देखील त्यांच्या वैवाहिक आयुष्यात चढउतार बघितला गेला आहे. सध्या मालिका एका खास ट्रॅक वर आहे, आणि त्यामुळे मालिकेची टीआरपीदेखील चांगलाच वाढला आहे. असं असलं तरीही, लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. आता ही मालिका अंतिम टप्प्यात आली आहे.
विशेष म्हणजे नेहा अर्थात अभिनेत्री प्रार्थना बेहरेने स्वतः आपल्या इंस्टाग्राम वरुन एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. ही पोस्ट शेअर करताना प्रार्थना चांगलीच भावुक झाल्याच दिसत आहे. कालच या मालिकेचा शेवटचा भाग शूट झाल्याचं प्रार्थनाने सोशल मीडियावरून सांगितलं. मालिकेचे कथानक सध्या चांगल्याच रंजक वळणावर आहे.
शिवाय मालिकेची लोकप्रियता देखील कायम आहे. त्यातच मालिका बंद होणार असल्याची माहिती मिळताच चाहते मात्र चांगलेच निराश झाले आहेत. हि मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेची अभिनेत्री प्रार्थना कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. मालिकेच्या सेटवरून देखील तीने अनेक वेळा वेगवेगळे व्हिडियोज शेअर केले आहेत.
तिच्या व्हिडियोच्या माध्यमातून मालिकेची बिहाईंड द सीन्स मौज मजा चाहत्यांना पाहायला मिळत होती. त्यामुळे देखील सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग बघितला जातो. नुकतंच प्रार्थनाने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये लाल रंगाची साडी घालून नेहा रस्त्यावर पळताना दिसत आहे.
ती घाईघाईत कुठेतरी जाण्यासाठी रिक्षाही थांबवतान दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहीलं, ‘चित्रीकरणाचा शेवटचा दिवस.’ तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी हि मालिका बंद करू नका, अशी विनंती देखील केली आहे.