महेश मांजेकर, प्रवीण तरडे यांनी दाखवला साधेपणा, जमिनीवर बसून केलं जेवण!

महेश मांजेकर, प्रवीण तरडे यांनी दाखवला साधेपणा, जमिनीवर बसून केलं जेवण!

अलीकडच्या काळात महेश मांजरेकर सतत वा’दाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटामुळे रंगलेला वा’द अद्याप कायम आहे. इतिहासासोबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असं मत सर्व-सामान्य व्यक्त करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाशी केवळ आपल्या स्वार्थापोटी सिनेसृष्टीतील कलाकार छेडछाड करत आहेत. त्यातच अक्षय कुमार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी पूर्णपणे चुकीची निवड आहे.

त्याचसोबत या चित्रपटात खूप साऱ्या गोष्टी केवळ मनोरंजन म्हणून दाखवण्यात येत असून इतिहास चुकीच दाखवण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. म्हणून अजूनही या चित्रपटाचा वाद गरम आहेच. असं असलं तरीही चित्रपटाचे चित्रीकरण मात्र सुरुच आहे.

आणि आता तर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या टीमला घेऊन मांजरेकर दख्खनच्या राजाच्या दर्शनाला गेले होते. विशेष म्हणजे ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर तिथल्याच पुजाऱ्यांच्या घरी संपूर्ण टीमसाठी पुरणपोळीच्या जेवणाचा खास बेत आखण्यात आला होता. ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण टीमनं तिथल्याच पुजाऱ्यांच्या घरी पुणरपोळीच्या मेजवानीचा आस्वाद घेतला.

पंगतीत बसून गप्पा मारत टीममधील कलाकरांनी पुरणाच्या पोळ्या, आमटी आणि भाज्यांवर ताव मारला. गायक आणि बिग बॉस मराठी फेम उत्कर्ष शिंदे देखील या चित्रपटात झळकणार आहे. त्यानेच आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वरुन हा एक व्हिडिओ शेअर केला आहे. कोल्हापुरात ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर मांजरेकर टीमला घेऊन एका ठिकाणी पोहाचले.

इथं त्यांच्यासाठी खास पुरणपोळीचा बेत आखण्यात आला होता. आपल्या पोस्टमध्ये उत्कर्ष लिहतो, “वेडात मराठे वीर दौडले सात “च आमचं शूटिंग कोल्हापूर मध्ये करत असताना आमचे दिग्दर्शक महेश मांजरेकर सर सर्व टीम मेंबर्स ला “दखनचा राजा जोतिबा देवस्थान “ला घेऊन गेले.

त्यांच्या दिग्दर्शनात एक नट म्हणून इतकं काही शिकतोय ते शब्दात सांगता येण्या सारखं नाहीये. एक वेगळाच अनुभव सर्व गुणी कलाकारानं सोबत वेळ घालवता येतोय ,प्रवीण तरडे दादा, सिद्धू दादा आणि माझे सर्व अन्य मित्र. ह्या सर्वां सोबत जोतिबा देवस्थान गेलो असता यांच्या सोबत जमिनिवर पंगतीती बसून जेवता आलं.

थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेता आला. खरं तर इतक्या गप्पा गोष्टी अनुभव घड्तायेत कि माझ्या येणाऱ्या आयुष्याला समृद्ध करतील असे क्षण व्यतीत करतोय सध्या .एक कलाकार म्हणून एक व्यक्ती एक माणूस म्हणून खूप काही शिकायला मिळत आहे सर्वां कडून तुम्हा सर्व रसिक माय बापाच्या आशीर्वादा मुळे हे शक्य होत आहे.’ दरम्यान, या व्हिडिओमध्ये मांजरेकरांसोबत प्रवीण तरडे, उत्कर्ष शिंदे, हार्दिक जोशी, विशाल निकम , सिद्धार्थ जाधव तसंच टीममधील इतर कलाकार दिसून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12