महिला फॅनने दिनेश कार्तिकसोबत केलं वाईट कृत्य, भर मैदानात जवळ येत तिनं कार्तिकला स्पर्श केला आणि….झपाट्याने Viral होतोय Video..

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारूनही इंडियाचा पराभव झाला होता. पण जोरदार उसंडी घेत आपल्या इंडियन टीमने 2-1ने ही टी ट्वेन्टी मालिका आपल्या खिशात घातली. पण नक्कीच या विजयामध्ये मोठा वाटा होता तो दिनेश कार्तिकचा.

कारण दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने उल्लेखनीय कामगिरी करत संघाला विजयाच्या जवळ आणले पण अखेरच्या षटकात विजय मिळवून दिला तो दिनेश कार्तिकने. त्यामुळे दिनेश कार्तिक सध्या चर्चेत आहे.

दिनेश कार्तिक ऑनफिल्ड आणि ऑफफील्ड खूप मस्तीच्या मूडमध्ये दिसतो. पण, भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर असं काही घडलं, ज्यानंतर डीके मैदानावर संतापलेला दिसून आला. दिनेश कार्तिकचा एक संतप्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिनेश कार्तिकची नाराजी स्पष्टपणे दिसतेय. व्हिडिओमध्ये एका मुलीच्या वर्तणूकीवर दिनेश कार्तिक संतापला होता.

नेमकं घडलं असं की, सामना संपल्यानंतर दिनेश कार्तिक हातात ट्रॉफी घेऊन फिरत होता. यादरम्यान एक मुलगी दिनेश कार्तिकच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसली. व्हिडिओ पाहिल्यावर कळतंय की, मुलगी दिनेश कार्तिकच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते पण, डीके त्या मुलीला दूर राहण्यास सांगतो.

सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू मैदानावर एकमेकांना भेटत असताना एक मुलगी डीकेच्या हाताला स्पर्श करताना दिसतेय. दिनेशला मुलीने केलेला स्पर्श आवडला नाही आणि तो तिच्यावर संतापला. कार्तिकच्या प्रतिक्रियेवरून त्याला मुलीने केलेल्या स्पर्शाचा खूप राग आल्याचं दिसतंय.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहता येतंय की, मुलीने स्पर्श केल्यानंतर ती डीकेची माफी मागताना दिसतेय. कार्तिकच्या या रूपाने मात्र सर्वांनाच धक्का बसला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या T20 मालिकेत भारतीय टीमचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला तिन्ही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. अशा परिस्थितीत डीकेने कांगारूंविरुद्ध 3 सामन्यात 212.50 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12