महिलांविषयी ‘प्रीती झिंटा’च बेताल वक्तव्य! म्हणाली, ‘एका अयशस्वी पुरुषामागे 2 लालची बायका…’

यंदाच्या वर्षात अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी मातृत्वाचा आनंद घेतला आहे. अनेक अभिनेत्री ने आपल्या बाळाला जन्म देत आहे होण्याचं सुख अनुभवत आहेत. अभिनेत्री आलिया भटने आणि बिपाशा बासू देखील लवकरच तिच्या बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे आता बॉलीवूड मधून आनंदवार्ता कानी येत आहेत.
सोनम कपूर प्रियंका चोप्रा आणि प्रीती झिंटा देखील सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहेत. प्रियंका चोप्रा आणि प्रीती झिंटा यांची आई होण्याची बातमी चांगली चर्चा झाली. दोघींनीही आई होण्यासाठी सेरोगेसीची निवड केली. त्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली. तर हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे म्हणत अनेकांनी त्यांना समर्थन देखील दिले.
दरम्यान सरोगसीच्या माध्यमातून प्रीती झिंटा 46 व्या वर्षी आईच बनली. जय आणि जिया अशा जुळ्या मुलांची ती आई आहे. तिच्या मुलांचा आज पहिला वाढदिवस आहे. आणि या निमित्ताने तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडिया वरती प्रीती झिंटा देखील बऱ्यापैकी सक्रिय असते.
असं असलं तरीही आपल्या मुलांचे फोटोज मात्र शेअर करायचंय ती टाळते. मात्र आपल्या मुलांच्या प्रथम वाढदिवस तिने अगदी बिनधास्तपणे त्यांचे फोटो शेअर केले होते. आणि त्यानंतर आता अधून मधून अनेक वेळा प्रीती आपल्या मुलांचे फोटोज शेअर करत असते. नुकतंच तिचा एक व्हिडियो सगळीकडे वायरल होत आहे.
सुरुवातीपासूनच प्रीती झिंटा आपल्या बिनधास्त आणि बोल्ड व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते. व्याल व्हिडियोमध्ये तिने आपल्या याच खुल्या विचारांना प्रकट केलं आहे. अनेकजण या व्हिडियोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका कार्यक्रमा मधील या व्हिडियोमध्ये प्रीती अगदी कॅझ्युअल लूकमध्ये दिसत आहे.
यावेळी प्रीती म्हणते, ‘एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तर एका अयशस्वी पुरुषामागे दोन स्त्रिया असतात..’ हे ऐकताच उपस्थित पुरुषवर्गामध्ये एकच हशा पिटते. त्यानंतर त्यातच पुढे प्रीती म्हणते, ‘एका यशस्वी स्त्रीमागे मात्र एक प्रगतीशील पुरुष असतो…मग ते तिचे वडील, भाऊ किंवा नवरा यापैकी कुणीही असू शकतं.’
तिच्या या विचारांचं काहींनी खुलेपणाने स्वागत केलं आहे. मात्र, काहींनी त्यावर टीका देखील केली आहे. ‘या बॉलीवूडच्या बायका कधीही काहीही बोलतात,’ असं म्हणत एका युजरने तिला हिणवलं आहे. तर दुसरा युजर त्याला उत्तर देत म्हणतो, ‘खुले आणि योग्य विचार नेहमीच लोकांना खटकतात.’