महाराष्ट्राची सुनबाई होणार IAS टीना दाबी, या मराठी IAS शी करणार लग्न….

महाराष्ट्राची सुनबाई होणार IAS टीना दाबी, या मराठी IAS शी करणार लग्न….

सोशल मीडिया एका असा प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर लोकप्रिय होण्याची जवळपास प्रत्येकालाच इच्छा असते. आणि सध्याच्या इंटरनेटच्या जगात हे अगदी सहजपणे साध्य देखील करता येत. इंस्टाग्राम किनगाव युट्युबवर अवघ्या काही मिनिटांचे व्हिडियो बनवून, अनेकजण प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत.

त्यापैकी अनेकांना चांगल्या कार्यक्रमात काम करण्याची संधी देखील भेटल्याच आपण पाहिलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कधी कोण लोकप्रिय होईल आणि त्यांना प्रसिद्धी मिळेल याचा काही नेम नाही. मात्र काही असे सेलेब्रिटी देखील आहेत, जे खरोखर प्रसिद्धी मिळवण्याच्या पात्र होते. या इंटरनेटमुळे अनेक रियल हिरोज बद्दल देखील जगाला माहिती मिळाली.

अनेक पोलीस ऑफिसर, IAS ऑफिसर, डॉक्टर्स यांच्या खऱ्या कर्तृत्वाबद्दल लोकांना समजले. अशा अनेकांचा देखील सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. अशाच खास रियल हिरो पैकी एक IAS अधिकारी टीना दाबी देखील आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध IAS अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये टीना दाबी यांच नाव अव्वल आहे.

मीडिया आणि सोशल मीडिया दोन्ही माध्यमांत त्या कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावर तर त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. मध्यंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर त्या खूप जास्त चर्चेत आल्या होत्या. आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील टीना नेहमीच चर्चेत राहिल्या.

त्यांची प्रेमकहाणी देखील तशीच होती. ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये टॉपर ठरलेल्या टीना यांची त्याच वर्षी दुसरे टॉपर बनलेल्या अतहर यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांचे एकमेकांवर प्रेम जुळले आणि त्यांनी लग्न केले. त्यावेळी या लग्नाने मीडियावर बऱ्यापैकी चर्चा रंगवली होती. परंतु त्या दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही.

एकमेकांमध्ये काही मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी विभक्त होण्याचा नरिणय घेतला. त्यानंतर त्या दोघांनी परस्पर संमतीने घ’टस्फो’ट घेतला. पण म्हणतात ना, खरं प्रेम जर कोणाच्या नशिबात असेल तर ते मिळतेच. आणि असच काही टीना दाबींच्या बाबतीत बघायला मिळाले आहे. टिना आता पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहेत.

यात सगळ्यात खास म्हणजे, या लग्नानंतर आता त्या महाराष्ट्राच्या सुनबाई होणार आहेत. चुरू जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रदीप गावंडे यांच्यासोबत टीना दाबी दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. प्रदीप गावंडे यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांनी आधी एमबीबीएस MBBS चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

इंस्टाग्रामवर टीना दाबी आणि प्रदीप गावंडे या दोघांनी देखील आपले एकत्र फोटो शेअर करत हि गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. या फोटोमध्ये दोघांनी लाल रंगाचे कपडे घातले आहेत. एकमेकांच्या हातात हात घालून असलेल्या या फोटोला ‘तुम्ही जे हास्य मला दिलंय, तेच मी परिधान केलंय’ असं कॅप्शन देत हा फोटो दोघांनी देखील शेअर केला आहे.

सध्या सगळीकडेच या फोटोची म्हणेजच टीना आणि प्रदीपच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. टीना दाबी प्रमाणेच प्रदीप यांचे देखील हे दुसरे लग्न आहे. मात्र यात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरत आहे, टीना दाबी यांचा दर दोन वर्षांनी घेतलेला आयुष्याचा महत्वाचा निर्णय. 2016मध्ये UPSC मध्ये टॉप केल्यानंतर त्यांनी 2018 मध्ये अतहर यांच्याशी लग्न केले.

त्यानंतर 2020मध्ये त्या दोघांनी परस्पर संमतीने घ’टस्फो’ट घेतला. आणि आता त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2022मध्ये त्यांनी प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. जयपूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये हे दोघे २२ एप्रिलला लग्नबेडीत अडकणार आहेत.

yash

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.