मल्लिका शेरावतचा बॉलिवूडबद्दल ध’क्कादा’यक खुला’सा, तिच्यासोबत घडलेली ‘ती’ घटना सांगताना म्हणाली; रात्री ३ वाजता घरी बोलून त्यांनी माझी…

‘भीगे होंठ तेरे, प्यासा दिल मेरा’ मधून लाईम लाइटवर आलेली मल्लिका शेरावत तुम्हाला आठवते का? एकेकाळी ती इतकी लोकप्रिय झाली होती की साऊथच्या प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांना तिला ‘गुरू’ चित्रपटातील में आयइम नंबर ‘मैंया मैंया’ मध्ये घ्यावे लागले.
मल्लिकाने महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पायलट करणसिंग गिलशी लग्न केले. पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. अम्बासियस मल्लिकाला ग्लॅमरची दुनिया खूप आवडली आणि घ’टस्फो’टानंतर ती मुंबईत आली. ख्वाहिश आणि म’र्ड’रच्या यशानंतर मल्लिकाला एकामागून एक अनेक चांगले चित्रपट मिळाले.
‘शादी के साइड इफेक्ट’, ‘वेलकम’ आणि ‘डबल धमाल’ नंतर अचानक एक दिवस मल्लिकाने जाहीर केले की, आता ती बॉलीवूडला बाय बाय बोलून हॉलिवूडमध्ये काम करायला जाईल. ‘हिस्स’ आणि ‘पॉलिटिक्स ऑफ लव’ मध्ये काम केल्यानंतर मल्लिका पुन्हा यशस्वी होऊ शकली नाही.
बॉलिवूड सोडण्याचे खरे कारण मल्लिकाने अलीकडेच तिच्या एका मुलाखतीत सांगितले. बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या बो’ल्डनेसमुळे कायमच चर्चेत राहिली आहे. सध्या ती चित्रपटांपासून दूर असली तरी चाहत्यांच्या संपर्कात असते. बॉलिवूडमधील सत्य परिस्थितीबाबत देखील ती खुलेपणाने बोलताना दिसते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान मल्लिकाने हिंदी चित्रपटसृष्टीबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. बॉलिवूडमधील का’स्टिंग का’उच आणि त्यादरम्यान मल्लिकाला आलेला अनुभव तिने सांगितला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मल्लिकाने सांगितलं की, ” ए लिस्टमधील सगळ्याच अभिनेत्यांनी माझ्याबरोबर काम करण्यास नकार दिला.
कारण मला कोणत्याच गोष्टीमध्ये तडजोड करणं योग्य वाटत नव्हतं. जी अभिनेत्री त्यांच्या दबावामध्ये राहील त्याच अभिनेत्री या कलाकारांना आवडायच्या. पण मी तशी नाही. माझं व्यक्तिमत्त्व त्या पद्धतीचं नाही.” पुढे बोलताना म्हणाली, “इतरांच्या इच्छेनुसार मी वागू शकत नाही. जर एखाद्या अभिनेत्याच्या चित्रपटामध्ये तुम्ही काम करत आहात आणि त्याने तुम्हाला रात्री तीन वाजता फोन करून घरी बोलावलं तर तुम्हाला जावं लागतं.
पण त्याचवेळी तुम्ही त्याच्या घरी गेला नाहीत तर चित्रपटामधून तुम्हाला बाहेर काढलं जाणार हे नक्की.” मल्लिकाचं हे वक्तव्य सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. तिने बॉलिवूडमधील सत्य परिस्थितीबाबत खुलेपणाने बोलणं पसंत केलं आहे. काही दिवसांपूर्वी मल्लिकाने दीपिका पदुकोणबाबतही एक वक्तव्य केलं होतं. २००४मध्ये ‘म’र्डर’ चित्रपटामध्ये जे मी केलं ते दीपिका आता करत आहे असं मल्लिकाने म्हटलं होतं.