मराठी भाषादिनावरून किरण मानेंनी उडवली सोनाली कुलकर्णीची खिल्ली, म्हणाले; ‘एक लाखासाठी नाचणारे…’

मराठी भाषादिनावरून किरण मानेंनी उडवली सोनाली कुलकर्णीची खिल्ली, म्हणाले; ‘एक लाखासाठी नाचणारे…’

आपण वर्षभरात वेगवेगळे दिवस साजरे करतच असतो. प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी खास असतो. काही दिवस, खास व्यक्तीच्या आठवणीत साजरे केले जातात. जस की, १४ नोव्हेम्बरला आपण सर्व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आठवणीत त्यांचा जन्मदिवस ‘बाल-दिवस’ म्हणून साजरा करतो.

त्याचबरोबर, ५ सप्टेंबर आपण डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आठवणीत शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. अगदी त्याचप्रकारे, २७ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण राज्यात ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या आठवणीत ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. पश्चिमात्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळं आता मराठी भाषा कमी वापरात येते, हे सत्य आहे.

त्यामुळे मराठी भाषा दिनाला आता सगळेचजण खास महत्व देत असल्याचं बघितलं जात आहे. यंदा देखील अनेकांनी आपल्या सोशल मीडियावरून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देत, मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी देखील पोस्ट केले होते.

मराठी भाषा दिनानिमित्त खास पोस्ट करत, या कलाकारांनी, मराठी सिनेसृष्टीला देखील यश मिळावे असं मत मांडलं होत. अनेकांनी या इमारतही कलाकारांच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देखील दिला. याच कलाकारांच्या यादीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच देखील नाव आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे.

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली. मात्र हि पोस्ट शेअर करताना तिच्याकडून एक मोठी चूक झाली. ‘मुलगी झाली हो’ फेम किरण मानेंनी ती चूक पकडली आणि त्याला उत्तर देत एक पोस्ट केली. सोनाली कुलकर्णीने पोस्ट केलं जेव्हा तिच्याकडून अक्षरांमध्ये चांगल्याच चुका झाल्या.

सोनाली कुलकर्णीने आपल्या पोस्टमध्ये लिहलं की, ‘न आणि ण.. श आणि ष…ळ आणि ड, चांदणी मधील च आणि चंद्रामधील च, जहाजमधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणाऱ्या मराठी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा! तर बाकीच्या काही विशेष लोकांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून खूप खूप षुभेच्छा!!!’ सोनाली कुलकर्णीने आपल्या पोस्टमध्ये अक्षरांच्या चांगल्याच चुका केल्या.

त्यावर किरण माने यांनी उत्तर देत लिहलं की, ‘उच्चार चुकवणाऱ्यांनी ‘डॅन्स’ची एक लाखाची सुपारी दिली की पारावरच काय ट्रालिवरबी नाचायचं… सगळं झाल्यावर इकडं येऊन खुशाल त्यांची टर उडवायची हे काय बरे न्हवं. अस्सल सातारीत बोलनार, या कायम न ला न म्हणणार.

या आमच्या लाडक्या राज्यांच्या वाढदिवसाला परवा परवाच साताऱ्यात येऊन नाचून गेल्या आहेत मॅडम… या नाट्यांना प्रमाण भाषेत बोलनारं कुत्रंबी ईचारत नाय. सगळं यश मिळवलंय ते ग्रामीण भूमिका करून. लिश्ट काढा हिट पिच्चरची.’ किरण मानेंची ही पोस्ट चांगलीच वायरल झाली. त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी सोनाली कुलकर्णीला ट्रोल देखील केलं.

मात्र त्यानंतर काही वेळात तिने आपली पोस्ट डिलीट देखील केली. तोपर्यंत तिची पोस्ट सगळीकडेच वायरल झाली होती. सोनाली कुलकर्णीने आपली पोस्ट डिलीट केल्यानंतर, अनेकांनी तिच्या आणि किरण माने यांच्या पोस्टचे स्क्रिनशॉट देखील शेअर केल्याचं बघितलं गेलं. मराठी भाषा दिनानिमित्त केलेली एक पोस्ट सोनाली कुलकर्णीसाठी मात्र चांगलीच महागात पडली.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.