मराठी सिनेसृष्टीबद्दल सई ताम्हणकरचा खुलासा, म्हणाली; इथे अभिनेत्रींना वागणूक अभिनेत्याच्या तुलनेत…

मराठी सिनेसृष्टीबद्दल सई ताम्हणकरचा खुलासा, म्हणाली; इथे अभिनेत्रींना वागणूक अभिनेत्याच्या तुलनेत…

२००८मध्ये आमिर खानच्या बहुचर्चित ‘गजनी’ चित्रपटामध्ये काहीच वेळासाठी एक मराठमोळी अभिनेत्री झळकली होती. त्याच वर्षी सुबोध भावे सारख्या कलाकारासोबत ‘सनई चौघडे’ या चित्रपटातून त्या अभिनेत्रीने मराठी सिनेसृष्टीमधे पाऊल टाकले. आपल्या पहिल्याच चित्रपटामध्ये या अभिनेत्रीवर रसिकांनी कौतुक आणि प्रेमाचा वर्षाव केला.

होय तुम्ही विचार करत आहेत तीच ही अभिनेत्री. आज मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजविणारी ‘सई ताम्हणकर’. सनई चौघडे चित्रपटात आपल्या कामाने सर्वाना सुख धक्का देणाऱ्या सईला आता मराठी सिनेसृष्टीमधे जवळपास १५ वर्ष झाले आहेत. या वर्षांमध्ये तिला अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना सामोरे जावं लागलं आहे.

मात्र सईने आजवर त्याबद्दल उघडपणे बोलायचं टाळलं आहे. असं नाही की, ती आपलं मत व्यक्त करत नाही. पण योग्य वेळीच अभिनेत्री आपलं मत मांडत असते. सहाजिकच तिने केलेल्या विधानांमुळे कायमच चर्चा रंगते. केवळ मराठी सिनेसृष्टीच नाही तर बॉलीवूड आणि साऊथच्या देखील काही महत्वाच्या प्रोजेक्टसमध्ये सईने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

नुकतंच तिला ‘मिमी’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट सह-कलाकार म्हणून आयफाचा अवॉर्ड मिळाला आहे. त्यामुळे सगळीकडेच सईच्या अभिनयाची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा सई चर्चेत आली आहे. एका मुलाखती दरम्यान सईने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रीचं स्थान काय आहे यावर भाष्य केलं आहे.

त्यामुळे आता चर्चाना उधाण आलं आहे. तीन केलेलं विधान चांगलंच खळबळजनक ठरत आहे. ‘मी स्वतःला प्रमुखपणे मराठी अभिनेत्रीच समजते. मी खूप जास्त काळ याच चित्रपटसृष्टीमध्ये घातला आहे, त्यामुळे इथल्या वातावरणाबद्दलच मी माझं मत देऊ शकते. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींना दु’य्य’म दर्जा दिला जातो.

इथे अभिनेत्रीचं मानधन देखील अभिनेत्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. मी यापूर्वी देखील खूप आधी याबद्दल भाष्य केलं होत. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही, त्यामुळे आता मी कमीच बोलते.’ त्यातच सई पुढे बोलली, ‘कोणत्याही चित्रपटामध्ये भूमिका साकारताना जितकी मेहनत एक अभिनेता घेतो, तेवढीच मेहनत अभिनेत्री देखील घेते.

अभिनेत्री देखील स्वतःला झोकून देत काम करतात. मात्र असं असलं तरीही अभिनेत्रींना त्यांच्या हक्काचं वेतन मिळत नाही. याबद्दल मी एकटीने बोलून फारसा काही फायदा होणार नाही. यासाठी मराठी सिनेसृष्टीमधील सर्व अभिनेत्रीनं एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. एकट्या अभिनेत्रींच्या बोलण्याने निर्माते-दिग्दर्शक यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही.

त्यामुळे सर्व अभिनेत्रींनी एकत्रितपणे याबद्दल उघडपणे बोललं पाहिजे. मात्र इथे केवळ अभिनेत्री बनण्यासाठी आणि ब्रेकच्या शोधात असणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत ज्या मिळेल ते मानधन घेऊन काम करण्यास तैयार होतात. यामध्ये नक्कीच बदल झालाच पाहिजे असं माझं ठाम मत आहे.’

दरम्यान नुकतंच अभिनेत्रीने आपला ३६वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी तिने उघडपणे आपल्या प्रेमाची कबूली देत निर्माता अनिश जोगच्या पोस्टचं उत्तर देत ‘लव्ह यु’ म्हणलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सई लग्नबेडीत अडकणार असल्याची चर्चा देखील सगळीकडे सुरु आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.