मराठी अभिनेत्रीची कमाल ! शेती करतेय म्हणून लोकं वेड्यात काढायचे, आज आहे कोट्यवधींची कंपनी…

मराठी अभिनेत्रीची कमाल ! शेती करतेय म्हणून लोकं वेड्यात काढायचे, आज आहे कोट्यवधींची कंपनी…

काहीच दिवसांपूर्वी बॉलीवूडचा दबंग खान सलमानचा ‘अंतिम’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. मुळशी पॅटर्न या सुपरहिट मराठी सिनेमावर आधारित अंतिम सिनेमा देखील चांगलाच सुपरहिट ठरला. मराठी सिनेमाचा रिमेक असल्यामुळं सहाजिकच या सिनेमाची मुळशी पॅटर्न सोबत तुलना झालीच.

कोणते पात्र कोणी रेखाटले, आणि विशेष म्हणजे कोणाचा अभिनय प्रेक्षकांना जास्त आवडला, याची जोरदार चर्चा झाली. खास करून सिनेमातील अभिनेत्री महिमा मकवानाच्या पात्राची चांगलीच चर्चा रंगली होती. अंतिम सिनेमात, महिमा सुंदर, निरागस आणि आकर्षक अशा मुलीच्या भूमिकेत होती.

मात्र मराठमोळी मालविका गायकवाड तिच्यावर वरचढ ठरली, असं प्रेक्षकांनी मत व्यक्त केलं होत. मालविकाने मुळशी पॅटर्नमध्ये एका चहावालीची भूमिका साकारली होती. बडोद्याच्या राजेशाही कुटुंबातील मालविकाने चहावालीची भूमिका देखील अगदी सहजपणे रेखाटली. त्यामुळे सगळीकडूनच तिचे खास कौतुक करण्यात आले होते.

सिनेमामध्ये अभिनय करण्यापूर्वी मालविका गायकवाड एका मोठ्या आयटी कंपनीमध्ये जॉब करत होती. मालविका एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला आयटी कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. गडगंज पगाराच्या नोकरीसाठी मालविका सुरुवातीच्या काळात अगदी उत्साहित होती.

मात्र हळूहळू आयटीच्या आयुष्याचा तिला कंटाळा येऊ लागला. त्यामध्ये तिचं मन रमलच नाही. एका जिममध्ये वर्कआऊट करताना, कोणीतरी मालविकाला थेट सिनेमात काम करणार का असा प्रश्न विचारला. त्यावेळी तिने हसत, कदाचित हा मस्करी करत आहे असा विचार करत हो म्हणलं. मात्र, त्यानंतर लगेच काहीच दिवसात तिची आणि प्रवीण तरडेंची भेट झाली आणि मुळशी पॅटर्नमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली.

मुळशी पॅटर्न सिनेमातून तिने मराठी चित्तरपटसृष्टीमधे पदार्पण केले. अभिनयाचा कोणताही अनुभव नसताना, तिने उत्तम प्रकारे आपले पात्र रेखाटले. त्यामुळे तिचे विशेष कौतुक देखील करण्यात आले. त्यानंतर मात्र, मालविकाने चित्रपटात फारसा रस दाखवला नाही. कारण सुरुवातीपासून तिला एक वेगळेच क्षेत्र आकर्षित करत होते.

शेतीमध्ये मालविकाला खूप रस होता. त्यामुळे आपण कमावलेल्या पैशांमधून तिने शिरुर येथे दीड एकर शेती विकत घेतली. त्यामध्ये तिने सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. तिच्या कुटुंबीयांनी आणि काही मित्र परिवारने तिला शेती करते म्हणून वेड्यात देखील काढले. मात्र मालविकाने या सर्व गोष्टींचा विचार केलाच नाही.

‘द ऑरगॅनिक कंपनी’ नावाने तिने सुरु केलेल्या कंपनीचा फायदा थेट शेतकऱ्यांना देखील झाला. आणि हळहळू तिचा बिझनेस वाढू लागला. विशाल चौधरी आणि जयवंत पाटील या खास मित्रांसोबत एकत्र येऊन ती दुग्ध व्यवसायात देखील उतरली.

‘हंपी ए २’ नावाची कंपनी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ, कोकोनट ऑइल यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीची उलाढाल कोटींच्या घरात आहे. १८-२० कोटींच्या या कंपनीचे नेट प्रॉफिट तब्ब्ल ४ कोटी रुपये आहे. एक यशस्वी आयटी इंजिनियर, अभिनेत्री आणि उद्योजिका म्हणून मालविकाला आता ओळखले जाते.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.