मराठमोळ्या शिव ठाकरेच्या आईने घेतली बिग बॉसमध्ये एन्ट्री, सलमानने मराठीत साधला संवाद, म्हणाला; आई हे मराठी बिग बॉस नाही..’

मराठमोळ्या शिव ठाकरेच्या आईने घेतली बिग बॉसमध्ये एन्ट्री, सलमानने मराठीत साधला संवाद, म्हणाला; आई हे मराठी बिग बॉस नाही..’

नुकताच बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडला. अखेरच्या टप्प्यात बिग बॉस मराठी मध्ये देखील सदस्यांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. तर अक्षय केळकरने बाजी मारत बिग बॉस मराठी चार चा विजेतेपद स्वतःच्या नावे केलं आहे आता बिग बॉस हिंदी कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदाच्या बिग बॉस हिंदी मध्ये बरच काही वेगळे आणि खास पाहायला मिळत आहेत. यावेळी बऱ्याच गोष्टींमध्ये बदल करण्यात आला आहे. स्वतः बिग बॉस खेळाडूंकडून त्यांचा उत्कृष्ट खेळ काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी बिग बॉस स्वतः मैदानात उतरल्याचे दिसत आहे. त्यामुळे बिग बॉस हिंदीचा खेळ चांगलाच रंगतदार पाहायला मिळत आहे.

बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे सगळीकडे चर्चेत आहे. पहिल्याच आठवड्यापासून आपल्या खेळाने सर्वांची मन जिंकली. खुद्द सलमान खानने उत्तम खेळ खेळत आहेस भावा म्हणत त्याचं तोंड भरून कौतुक केलं. आता बिग बॉस हिंदी देखील आपल्या अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे.

त्यातच यावेळी बिग बॉस हिंदी मध्ये सदस्यांच्या घरच्यांनी दमदार एन्ट्री घेतली आहे. विशेष म्हणजे बॉस हिंदी मध्ये मराठमोळ्या शिव ठाकरे चा बोलबाला पाहायला मिळत आहे. तर आता त्याच्या आईने घरामध्ये एन्ट्री घेतली आहे.

आपल्या उत्तम खेळाने शिव ठाकरे ने सर्वांची मन जिंकलीच आहेत मात्र यावेळी त्याच्या आईने देखील आपल्या अगदी सर्वसामान्य आणि सोज्वळ अशा शैलीने खुद्द सलमान खानची मन जिंकलं. घरातील अनेक सदस्यांच्या कुटुंबाने यावेळी विकेंडच्या भागात बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली.

त्यावेळी सर्वच सदस्यांच्या कुटुंबीयांनी सलमान खान सोबत खेळाबद्दल आपले मत व्यक्त करत चर्चा केली. विशेष म्हणजे यादरम्यान सलमान खानने शिव ठाकरेच्या आईसोबत मराठीत चांगल्या गप्पा मारल्या. ‘आई कसं वाटत आहे? तुमचा मुलगा चांगला खेळत आहे आणि सोबतच सर्वांची मन देखील जिंकत आहे.’

हे ऐकताच शिव ठाकरे च्या आईने होकार भरत माझा मुलगा खूप हुशार आहे असं म्हणत सलमानला उत्तर दिलं. त्यानंतर सलमान म्हणाला सगळ काही ठीक आहे ना मग आता? शिव ठाकरेच्या आईने देखील सलमान सोबत मराठी मधे गप्पा मारायला सुरुवात केली.

त्यातच सलमान त्यांना थांबवत म्हणाला, ‘ आई हे काय आहे? हे मराठी नाही हिंदी बिग बॉस आहे ना?’ त्याच्या आईने देखील सलमानचा इशारा समजला आणि हिंदीमध्ये बोलण्यास सुरुवात केली. सलमानने पुढे शिवच्या आईला प्रश्न केला की, ‘शिवला मंडळीचा मास्टरमाईंड समजलं जातं. म्हटलं जातं की तो गेम खेळत आहे हे ऐकून कस वाटत?’ त्यावर त्याची आई बोलली, ‘ सर अस काही नाही.

मंडली वगैरे काही नाही. तो त्यांना आपल कुटुंब समजून खेळ खेळत आहे.’ त्यावर सलमान म्हणाल, ‘ आई मी त्याच कौतुक च करत आहे.’ त्यानंतर सर्व सदस्यांच्या कुटुंबीयानी निरोप घेतला. त्यावेळी देखील शिव ठाकरेच्या आईला अत्यंत आदराने सलमानने निरोप दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12