‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्राने किसिंग सिनबद्दल केला खुलासा, म्हणाला; “मला आधी माहिती नव्हतं, पण तरीही..”

मराठी सिनेसृष्टी आज चांगलीच मोठी झाली आहे. मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकणारे स्टार्स देखील चांगलेच मोठे सेलिब्रिटी समजले जातात. एखाद्या सिनेमा मधून नावारूपास आलेला अभिनेता किंवा कलाकार हमखास यश मिळवतोच. या कलाकारांची लोकप्रियता आज शिगेला पोहोचल्याच आपण बघत आहोत.
यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी हिंदी सेलिब्रिटींना देखील मागे टाकले आहे. बदलत्या काळासोबत आता मराठी सृष्टीमध्ये देखील कमालीचे बदल झाले आहेत. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी अनेक वेगवेगळे शोज आणि चित्रपट आज मराठी सेनेसृष्टीमध्ये बनत आहेत. प्रेक्षकांचा देखील त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
तरुणाई मध्ये नुकतच लोकप्रियता मिळवलेली मालिका म्हणून मन उडू उडू झालं नावारुपास आली. या मालिकेने अनेकांना आपल्याकडे आकर्षित केले. यामुळेच या मालिकेची लोकप्रियता प्रचंड वाढली. इंद्रा आणी दिपूची जोडी तर प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली. एव्हाना मालिका संपली असली तरीही इंद्रा व दिपूच्या आठवणी सतत निघत असल्याचे दिसत आहेत.
इंद्राची भूमिका साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊतला या मालिकेतून एक खास ओळख मिळाली. मन उडू उडू झालं ही मालिका त्याच्या करिअरमध्ये टर्निंग पॉईंट ठरली म्हणायला हरकत नाही. आता हाच अजिंक्य एका वेगळ्या आणि तेवढ्याच बोल्ड भूमिकेत समोर येणार आहे. टकाटक2 या अड ल्ट सिनेमात अजिंक्य भूमिका साकारणार आहे.
इतकंच काय तर या सिनेमात त्याने चांगलेच बो’ल्ड आणि भ’डक इ’न्टिमेट सी’न्स दिले आहेत. त्याबद्दल त्याने स्वतः एका मुलाखतीमध्ये खुलासा केला. इंद्रा ही भूमिका साकारत अजिंक्यने स्वतःची एक खास ओळख निर्माण केली. एक काळजी घेणारा, प्रेमात वेडा मात्र तेवढाच शहाणा आणि सच्चा मनाचा तरुण अशी इंद्राचे पात्र सकरल्यानंतर त्याची प्रतिमा तयार झाली.
मात्र आता अतिशय बोल्ड भूमिकेत बघून प्रेक्षकांच्या समाविष्ट प्रतिक्रिया समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सिनेमात माझं पात्र शऱ्या असं आहे. यापूर्वी कधीच मी असं बोल्ड पात्र साकारलं नाही. मला शिव्या द्यायची देखील सवय नाही. त्यामुळे हे पात्र साकारताना मी शक्य तितका निरागस भाव ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
माझ्या पात्राचं शूट सुरू झाल्यावर अगदी सुरुवातीच्या काळात कि’सिंगचा सीन होता. एका मोकळ्या मैदानावर हा कि सिंग सीन शूट होणार होता. पण मी ठरवलं यामध्ये आता उडी घेतली तर काम चोख करायचं. आपल्या स्वभावापेक्षा काहीतरी वेगळं करावंच लागेल. त्यामुळे मी माझे शंभर टक्के देऊन हे धाडस करण्याचा प्रयत्न केला.
तो सीन करण्यापूर्वी मनावर भलं मोठं दडपण आलं होतं. आणि सीन झाल्यावर अक्षरशः एखादा मोठा टप्पा पार केल्यासारखा मला वाटलं. मी हा सिनेमा लॉकडाऊनच्या काळात केला. जेव्हा मी परभणीहून मुंबईला एका प्रोजेक्टसाठी आलेलो आणि तो प्रोजेक्ट मी करत नाही असं मला समजलं.
मन उडू उडू झालं ही माझ्या आयुष्यात नंतर आलेली मालिका आहे. हा सिनेमा एक वेगळा प्रयोग म्हणून मी केला. स्वतःच्या कम्फर्ट झोन च्या पलीकडे जाऊन काहीतरी करावं म्हणून हा सिनेमा केला,’ असं अजिंक्यने सांगितले.