मनोरंजनसृष्टी हा’दरली! तारक मेहता मधील प्रसिद्ध अभिनेत्याचं नि’धन…

नुकतंच सर्वानी नवीन वर्षांचं अगदी जल्लोषात आणि उत्साहात स्वागत केलं आहे. हा उत्साह सगळीकडेच बघितला गेला. को’रोनाच्या पार्श्वभूमीवर तब्ब्ल दोन वर्षांनी सार्वजनिक पद्धतीने नवीन वर्षाच स्वागत केलं. त्यामुळे सगळीकडेच याबद्दलचा खास उत्साह पाहायला मिळाला. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वांचाच आनंद द्विगुणित असल्याच पाहायला मिळालं.
केवळ सर्वसाधारणच नाही तर मनोरंजन सृष्टीमधील अनेक सेलिब्रिटींनी देखील अगदी जल्लोषात नवीन वर्षाच स्वागत केलं. कित्येक पार्ट्यांचं आयोजन केल्याच आपण पाहिलं आहे. या पार्ट्या एव्हाना सुरूच होत्या. आता नवीन वर्षाचा उत्साह कमी होतो न होतो तोच एक अतिशय दुःखद आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे.
या बातमीने केवळ हिंदीच नाही तर मराठी मालिकाविश्वाला देखील मोठा ध’क्का बसला आहे. एका प्रसिद्ध कलाकाराचे वयाच्या ४० व्या वर्षी अकाली नि’धन झाल्याची ध’क्का’दायक बातमी समोर आली आहे. या बातमीने मनोरंजन सृष्टी हा’दरली आहे. प्रसिद्ध हिंदी कॉमेडी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये महत्वपूर्ण भूमिका रेखाटणाऱ्या एका कलाकाराचे नि’धन झाले आहे.
माघील १५ वर्षांपासून मनोरंजनसृष्टीमध्ये आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे सुनील होळकर यांच नि’धन झालं असल्याची वार्ता समोर आली आहे. अभिनेता, निवेदक अशी त्यांची ख्याती होती. अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत त्यांनी बरीच वर्षे काम केलं. समोर आलेल्या अधिक माहिती नुसार, सुनील होळकर यांना सोरायसिस सारखा दु’र्धर आजार झाला होता.
ते बऱ्याच काळापासून या आजाराने त्र’स्त होते. अनेक उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘मॅडम सर’, ‘मि. योगी’ सारख्या मालिकांमध्ये सुनील होळकरांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘मोरया’ या सारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची चमक दाखवली.
इतकंच नाही तर ‘भुताटलेला’ वेब सिरीज मधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सोरायसिस हा अत्यंत कठीण आजार आहे. या आजारामध्ये कधीही शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. याच कारणामुळे अचानकच सुनील यांची प्रकृती खालावली. विशेष म्हणजे काल पर्यंत ते ठीक होते, आज अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी एक मूल असा परिवार आहे. त्यांच्या नि’धनाची बातमी समोर येताच मराठी सिनेसृष्टीमधील अनेक कलाकारांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.