भन्नाट लव्हस्टोरीचा थ्रिलिंग किस्सा ! प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी धावत्या ट्रेनमध्ये चढले होते शत्रुघ्न सिन्हा, प्रपोज केल्यानंतर सर्वांसमोर…

भन्नाट लव्हस्टोरीचा थ्रिलिंग किस्सा !  प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी धावत्या ट्रेनमध्ये चढले होते शत्रुघ्न सिन्हा, प्रपोज केल्यानंतर सर्वांसमोर…

आपण जेव्हा बॉलीवूडचा एखादा सिनेमा बघतो तेव्हा कायम असा विचार करत असतो की, असं खऱ्या आयुष्यात खरोखर होऊ शकत का? अनेक वेळा आपण, आपल्या आसपास काही प्रेमकथा ऐकतो ज्या अगदी हुबेहूब आपल्याला एखाद्या बॉलीवूडच्या सिनेमाची आठवण करून देतात.

मात्र बॉलीवूडकरांच्या खऱ्या आयुष्यात देखील अश्या घटना घडतात ज्या हुबेहूब एखाद्या सिनेमासारख्याच असतात. बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते शत्रूग्न सिन्हा यांच्या बाबतीत देखील अगदी असंच काही घडलं होत. चित्रपटात धमाकेदार ऍक्शन सीन करणाऱ्या शत्रूग्न सिन्हा यांच्या खऱ्या आयुष्यात देखील असे अनेक किस्से आहेत. त्यांचं खरं आयुष्य देखील अश्याच थ्रीलनं भरलेलं आहे.

आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी देखील शत्रूग्न यांनी आपल्या खऱ्या आयुष्यात मोठ्या रोमांचकारी अश्या ऍक्शनचा सीनच जणू रिक्रिएट केला होता. खामोश या डायलॉगने आणि बॉलीवूडचे शॉटगन म्हणून ओळखले जाणारे शत्रूग्न खऱ्या आयुष्यात खूपच रोमँटिक आहे. आपल्या पत्नीला म्हणजेच पूनम याना त्यांनी चक्क धावत्या ट्रेनमध्ये प्रपोज केलं होत.

धावत्या ट्रेनमध्ये शत्रूग्न यांनी प्रवेश केला आणि सर्वांसमोर कोणाचीही पर्वा न करता पूनम याना त्यांनी प्रपोज केलं. सहाजिकच त्यांच्या या धाडसी प्रवृत्तीमुळेच पूनम देखील त्यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी शत्रूग्न यांचे प्रपोजल स्वीकारले.थाटामाटात दोघांच लग्न झालं, अन् आज त्यांच्या या सुखी संसाराला तब्बल ४१ वर्ष पूर्ण झाली आहेत.

एका पार्टीमध्ये शत्रूग्न आणि पूनम या दोघांची भेट झाली होती. त्या दोघांची भेट झाली तेव्हा ते रीना रॉय यांना डेट करत असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्या पार्टीत पूनम यांचं सौंदर्य पाहून शत्रुघ्न सिन्हा पूर्णपणे घायाळच झाले होते. एखादी मुलगी इतकी सुंदर कशी असू शकते असं पूनमला प्रथम बघून त्यांना वाटलं होत, असं एका मुलाखतीमध्ये त्यांनी स्वतः सांगितले आहे.

पूनम तेव्हा यांनी मिस यंग इंडिया ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. तेव्हा पूनम यांची सगळीकडेच प्रचंड सुरु चर्चा होती. त्यांचे सौंदर्य हा एका चर्चेचा विषय बनला होता. बरेच दिग्गज अभिनेते आणि निर्माते त्यांच्याशी सलगी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अखेर बाजी मारली शत्रुघ्न सिन्हा यांनीच. शत्रूग्न सिंह यांनीच पूनमला इम्प्रेस केलं.

दोघांमध्ये छान मैत्री झाली अन् मग पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. यातच लक्षवेधी बाब म्हणजे त्यांनी चालत्या ट्रेनमध्ये पाकिजा चित्रपटातील ‘अपने पांव जमीन पर मत रखिएगा…’ हा डायलॉग म्हणत पूनम यांना लग्नासाठी मागणी घातली होती. त्या दोघांच्या लग्नाला पूनम यांच्या कुटुंबीयांचा चांगलाच विरोध होता. त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा एक स्ट्रगलिंग अॅक्टर होते.

आणि मग ‘हिरा मोती’ या चित्रपटानं त्यांच्या करिअरमध्ये एक जबरदस्त वळण आलं. या सुपरहिट चित्रपटानंतर शत्रूग्न यांच्याकडे प्रसिद्धी आणि पैसे दोन्ही गोष्टी मुबलक प्रमाणात आल्या. आणि मग १९८० साली पूनम यांच्या कुटुंबीयांनी देखील त्या दोघांच्या लग्नाला संमती आली. आणि त्या दोघांचं लग्न झालं. यात सर्वात आश्चर्यकारक बाब ही, लग्नापूर्वी तब्ब्ल ७ वर्ष कोणताच गाजावाज न करताते दोघे अगदी गुपचूप एकमेकांना डेट करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12