बॉलीवूडवर शोककळा..! बॉलिवूडची नय्या पार करणाऱ्या दिग्ग्ज अभिनेत्याचं नि’धन.

मुघले-ए-आझम, अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर हे असे सिनेमा आहेत, ज्यांचे रिप्लेसमेंट बॉलीवूडमध्ये होऊच शकत नाही. या सिनेमांचे प्रमख आकर्षण होते दिलीप कुमार. आजही या सिनेमांचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत.
केवळ, जुने लोक किंवा सत्तरच्या दशकातील लोकच नाही तर, आजच्या दशकातील प्रेक्षक देखील या सिनेमाचा आनंद घेतात. आपल्या दमदार अभिनयाने या सिनेमाचा दर्जाचं दिलीप कुमार यांनी उंचावला होता. दिलीप कुमार यांनी १९४०-७० अशी जवळपास तब्बल तीन दशकं, आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली होती.
त्यामुळेच,आजही भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार, स्ट्रगलर्स त्यांना आपला आदर्श मानतात. बऱ्याच कलाकारांनी, त्यांची नक्कल करत बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. बॉलीवूड मधील ट्रॅजिडी किंग म्हणजेच दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं आज सकाळी नि’धन झालं आहे.
दिलीप कुमार याना माघील काही दिवसांपासून, श्वा’स घेण्यास त्रा’स होत होता. त्यामुळे त्यांना मुंबई येथील हिंदुजा रु’ग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान, ९८ वर्षांच्या दिलीप कुमार यांनी आज पहाटे अखेरचा श्वा’स घेतला.
काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना इतर काही आ’जारांसमवेत श्वा’स घेण्यास अ’डचण येत असल्याने, रु’ग्नायालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना रु’ग्णाल’यात दा’खल केल्याची बातमी समोर आल्यापासूनचं त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी प्रार्थना करत होते.
पण, कलसमोर कोणाचाच जोर चालत नाही. आणि त्यांच्यावर उ’पचार सुरू असतानाच दिलीप कुमार यांनी जगाचा नि’रोप घेतला. लिजेंडरी अभिनेते दिलीप कुमार यांच्या नि’धनामुळे संपूर्ण बॉलिवूडवरमोठी शोककळा पसरली आहे. पा’किस्ता’नमधल्या पेशावरमध्ये दिलीपकुमार यांचा जन्म झाला होता.
त्यांचं मुळ नाव मोहम्मद युसूफ खान असं होतं पण बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना एका दिग्दर्शकाच्या सल्ल्याने त्यांनी आपलं नाव दिलीप कुमार असं ठेवलं आणि त्यानंतर जगभरात ते दिलीपकुमार नावानेच ओळखले गेले. बेस्ट अॅक्टरसाठी सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड जिंकण्याचं रेकॉर्ड दिलीपकुमार यांच्या नावावर आहे.
दिलीपकुमार यांनी अभिनयासोबतच काही चित्रपटांची निर्मितीही केली. कधीही गरजूंना मदत करणारा आणि दिलदार अभिनेता म्हणून त्यांना बॉलीवूडमध्ये ओळखले जातं होत. १९४४ साली बॉम्बे टॉकिजनं निर्माण केलेल्या ज्वार भट्टा सिनेमामधून दिलीपकुमार यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केलं.आणि त्यानंतर त्यांनी कधीच माघे वळून पाहिलं नाही.
लोकप्रियतेचे नवनव्या शिखरांवर ते जाऊन पोहोचले. १९९८मध्ये आलेला किला हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. त्यांची ट्रॅजिडी किंग अशी ओळख होती. दिलीप कुमार यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले, पण मुळात झुंझारु वृत्तीच्या दिलीप कुमार यांनी अगदी यशस्वीपणे त्यावर मात केली.
वयाच्या ९८ व्या वर्षी देखील ते आजारावर मात करुन घरी परतले होते. मात्र आज काळ जिंकला आणि ते हरले, व हिंदुजा रुग्णालयात या दिग्ग्ज, लिजेंडरी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.