बॉलीवूडमधेही गाजणार छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा डंका! ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार भूमिका…

बॉलीवूडमधेही गाजणार छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा डंका! ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार भूमिका…

अलीकडेच ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांची सगळीकडेच जोरदार चर्चा रंगल्याच पाहायला मिळत आहे. एका दिग्ग्ज राजकारणी व्यक्तीने संभाजी महाराजांना, ‘स्वराज्य रक्षक’ म्हणून संभोधले. त्यानंतर जणू संभाजी महाराजांना उपाधी देण्यासाठी सर्वांमध्ये चढाओढच सुरु झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतापी आणि शूर छावे आणि स्वराज्याचे धाकले धनी, हा मुद्दा कायमच सर्वासाठी खूप जवळचा आणि खास आहे. त्यातच आता बॉलीवूडमध्ये देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात येणार आहे. नुकतंच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध मराठी आणि बॉलीवूड दिग्दर्शक लक्ष्मण उतरेकर करणार आहेत. लक्ष्मण उतरेकर यांनी आजवर अनेक उमदा चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. टपाल या मराठी चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. त्यानंतर लुका छुपी आणि मिमी सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

मिमी या चित्रपटाने तर सगळीकडेच खास कौतुकाची दाद कमवली. मिमी चित्रपटाने यंदा अनेक पुरस्कार आपल्या नावे केली आहेत. त्यामुळे संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तम होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सद्वारे केली जाईल.

आजवर लक्ष्मण यांनी अगदी हलक्या फुलक्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मात्र छत्रपती संभाजी राजेंचा जीवनपट पडद्यावर आणण्याचा विचार करत आहेत. हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यांना संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचा असून. हा चित्रपट शक्य तितका भव्य बनवण्यासाठी निर्माते कोणतीही कसर सोडणार नाहीत, असं ते म्हणाले आहेत.

या चित्रपटासाठी खास व्हीएफएक्स, देखील वापरण्यात येणार आहेत. या प्रोजेक्टबद्दल बोलताना लक्ष्मण म्हणाले की, ‘गेल्या सहा महिन्यांपासून मी या चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटात उच्च दर्जाचे व्हीएफएक्स देखील वापरण्यात येणार आहेत. चित्रपटाचं लेखन पूर्ण झालं आहे. मात्र आताच आम्ही चित्रपटाच्या नावाची घोषणा करू इच्छित नाही.

माझी टीम सध्या प्री-प्रॉडक्शनमध्ये आहे. दिनेश विजन या चित्रपटाला आपला पूर्ण पाठिंबा देत आहेत आणि हा चित्रपट खरोखरच भव्यदिव्य बनवण्यासाठी खूप मोठे बजेट मंजूर केले आहे. या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल साकारणार आहे.’ बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

उरी सारख्या चित्रपटामुळे त्याला बॉलीवूडमध्ये खास स्थान निर्माण करण्यात यश आले आहे. काही ऐतिहासिक सिनेमामध्ये देखील त्याची निवड झाली होती. मात्र, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल शोभेल किंवा नाही हे लूक समोर आल्यावरच समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12