बॉलिवूड अभिनेत्रींनंतर मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने नवऱ्यासोबत मिळून दिली गुडन्यूज, म्हणाली; माझा नवरा होकार देत नव्हता म्हणून मी….

बॉलिवूड अभिनेत्रींनंतर मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने नवऱ्यासोबत मिळून दिली गुडन्यूज, म्हणाली; माझा नवरा होकार देत नव्हता म्हणून मी….

मागील काही काळापासून मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. चंद्रमुखी या चित्रपटांमध्ये तिला भरभरून प्रतिसाद मिळाला. चित्रपटामध्ये अमृताने कलावंतीन ची भूमिका साकारली आहे.

यामधील तिच्यातील दिलफेक अदांवरती चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत. या चित्रपटासह तिने हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये देखील आपले पाय चांगलेच रोवले असल्याचे बघायला मिळत आहे. राजी चित्रपटातून अमृता खानविलकर पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली. त्यानंतर हिंदी मनोरंजन सृष्टीमध्ये तिची एक खास ओळख निर्माण झाली.

खतरों के खिलाडी मध्ये अमृताने धुमाकूळ घातला. यादरम्यान देशभरात तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. त्यातच आता अमृता सेलिब्रिटींचा खास शो झलक दिखला जा मध्ये देखील सहभागी झाली आहे. यंदाच्या झलक दिखला जा पर्वा मध्ये मराठी कलाकारांचा बोलबाला बघायला मिळत आहे.

यंदाच्या सीझनमध्ये अमृता खानविलकर सह मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजन आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदे देखील सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता सगळीकडेच खास करून महाराष्ट्रात झलक दिखला जा शोची चांगली चर्चा रंगल्याचं बघायला मिळत आहे.

अमृता आपल्या उत्तम अशा नृत्याने केवळ जजच नाही तर प्रेक्षकांचे देखील मन जिंकत आहे. त्यातच आता तिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. विशेष म्हणजे याबद्दल स्वतः अमृताने खुलासा केला आहे. मागील बऱ्याच काळापासून बिग बॉसच्या सोळाव्या पर्वा मध्ये अमृता झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

याबद्दल अमृताला विचारले असता तिने होकार दिला आणि म्हणाली, ‘हे खरं आहे की मला बिग बॉसच्या मेकर्स कडून सोळाव्या सीझनमध्ये सहभागी होण्या साठी ऑफर देण्यात आली आहे. अर्थात कोणत्याही कलाकारासाठी बिग बॉस सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये वर झळकने साधारण बाब नाही. माझ्यासाठी देखील बिग बॉस मध्ये जाणं खूप महत्त्वाचं ठरेल.

बिग बॉस मध्ये जाण्यासाठी सहाजिकच मी देखील उत्साही आहे. परंतु हा निर्णय केवळ मी एकटी घेऊ शकत नाही. हिमांशू ने परवानगी दिल्यानंतरच याबद्दल कोणताही निर्णय मी घेईल. हिमांशुनी होकार दिला तरच बिग बॉसच्या सोळाव्या सीझनमध्ये मी सहभागी होईल. तूर्तास मी झलक दिखला जा मध्ये माझं काम करत आहे.

झलक हा शो संपल्यानंतरच मी बिग बॉस मध्ये सहभागी होऊ शकेल. परंतु अर्थात त्यासाठी हिमांशू कडून ग्रीन सिग्नल येण्याची मी वाट बघत आहे.’ दरम्यान, झलक दिखला जा मध्ये अमृता आणि गश्मीरच्या डान्सवर प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. त्यामुळे दोघेही या शोमध्ये बराच काळ टिकून राहतील अशी आशा चहा त्यामध्ये निर्माण झाली आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.