बॉलिवूडवर पुन्हा शोककळा; राजू श्रीवास्तव यांच्यानंतर सलमानच्या जवळच्या व्यक्तीचा ट्रेडमिलमुळे मृ’त्यू, सलमानसोबत 50 पेक्षा जास्त चित्रपटात त्याने…

अलीकडेच कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील जिममधील ट्रेड मिलमध्ये व्यायाम करताना हृदयवि’काराचा झट’का आला. त्यानंतर सुमारे 40 दिवसांनी 21 सप्टेंबर रोजी कॉमेडियनचे निध’न झाले. काही महिन्यांपूर्वी साउथ सुपरस्टार पुनीत राजकुमारचे देखील जिम मध्ये व्यायाम करत असताना हृदयविका’राच्या झ’टक्याने निध’न झाले होत.

अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या घटना अधिकाधिक प्रमाणात पाहायला मिळत आहेत. बॉलीवूडला तर एकापाठोपाठ एक असे झटके बसतच आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या नि’धनाच्या झ’टक्यातून मनोरंजन सृष्टी सावरत असतानाच पुन्हा एकदा मोठा हा’दरा बसवणारी एक बातमी समोर आली आहे.

सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीचे नि’धन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. सलमान खानचा डुप्लिकेट म्हणून प्रसिद्ध असलेल्या सागर ‘सलमान’ पांडेचे निध’न झाले आहे. ही घटना आज 30 सप्टेंबर रोजी दुपारी 1.00 वाजताच्या सुमारास घडली.

जिममध्ये वर्कआउट करत असताना सलमान पांडेला हृदयवि’काराचा झटका आला, त्यानंतर त्याचा मृ’त्यू झाला. ते सुमारे 50 वर्षांचे होते. सागरने बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो आणि टीव्ही शो बिग बॉस यांसारख्या अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये सलमान खानसाठी बॉडी डबल म्हणून काम केले होते.

सागर, सलमानचा डुप्लिकेट म्हणून खूप प्रसिद्ध होता आणि तो अनेकदा देशभरातच नव्हे तर परदेशातही स्टेज शो करत असे. सागरचा मित्र आणि शाहरुख खानचा डुप्लिकेट राजू रायकवार याने फोनवरून एबीपी न्यूजला सांगितले की, हृदयवि’काराचा झट’का आल्यानंतर दोन जिम इन्स्ट्रक्टर त्याला जवळच्या सुविधा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

तिथे डॉक्टरांनी त्याला जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर हॉस्पिटलमध्ये नेले. नावनोंदणी करण्यास सांगितले. दुपारी २.३० च्या सुमारास डॉक्टरांनी सागरला मृ’त घोषित केल्याचे राजू यानी माहिती दिली आहे. सागर हा उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी होता आणि मित्र राजूच्या म्हणण्यानुसार, सागरचे अंतिम संस्कार प्रतापगडमध्येच केले जाणार आहेत.

2020 मध्ये, को’रोना लॉकडाऊन दरम्यान, एबीपी न्यूजने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या सागर ‘सलमान’ पांडेसोबत खास भेट घेतली होती. एबीपी न्यूजशी संवाद साधताना त्यांनी को’रो’नाच्या काळात आणि लॉकडाऊनच्या काळात कोणतेही उत्पन्न न मिळाल्याने आर्थिक अडचणीत आल्याबद्दल सविस्तर सांगितले होते.

को’रो’नाच्या काळात सलमान खानने हिंदी चित्रपटसृष्टीतील हजारो मजूर आणि कनिष्ठ कलाकारांना करोडो रुपयांची मदत केली. सागर ‘सलमान’ पांडेनेही सलमानकडून काही महिन्यांसाठी मदत म्हणून 3000-3000 रुपये घेतले आणि सागरप्रमाणेच इतर डुप्लिकेटलाही ही रक्कम मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12