बॉलिवूडच्या ‘या’ व्यक्तीने शिफारस केल्यामुळे ‘बिग बींनी’ स्वीकारला नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ चित्रपट…

बॉलिवूडच्या ‘या’ व्यक्तीने शिफारस केल्यामुळे ‘बिग बींनी’ स्वीकारला नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ चित्रपट…

नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट ४ मार्चला प्रदर्शित झाला. पण प्रदर्शना पूर्वीच ‘या’ चित्रपटाची खूप चर्चा होताना दिसत होती. कारण या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते आणि नागराज मंजुळे यांचा हा पहिला वहिला हिंदी चित्रपट आहे.

दरम्यान, अनेक दिग्ग्ज कलाकारांनी या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहेत. त्यात दक्षिणात्य सुपरस्टार धनुषने देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, हा चित्रपट पाहून मी स्तब्द झालोय आणि बिग बींचा अभिनय अतिशय उत्तम असा आहे. त्याच दरम्यान अमीर खानने देखील या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले.

त्याने त्याच्या घरी चित्रपटाच्या टीमला बोलावून त्यांचे विशेष कौतुक त्याने केले. त्याचबरोबर चित्रपटाचे कथानक त्याला एवढे आवडले कि त्याने थेट संधी मिळाली तर नागराजच्या चित्रपटात काम करेल अशी ईच्छा बोलून दाखवली. पुढे तो म्हणाला कि, जे आम्ही गेल्या १५-१६ वर्षात केले नाही ते नागराजने करून दाखवले, तसेच त्याने आकाश ठोसच्या भूमिकेचे देखील कौतुक केले.

तसेच मराठी कलाकार केदार शिंदे यांनी देखील झुंड चित्रपटाचे कौतुक केले आहे. केदार शिंदे यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट केलं आहे. हे ट्वीट करत केदार शिंदे म्हणाले, “जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. म्हणून ‘झुंड’ हा चित्रपट पाहा.” केदार शिंदे यांनी केलेलं हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मात्र, प्रेत्यक चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी नवीन कलाकाराला संधी देणारे नागराज मंजुळे यांनी या चित्रपटात मात्र महानायक अमिताभ बच्चन यांना घेतले, हे त्यांचं स्वप्न पण बिग बी हा चित्रपट करण्यासाठी तयार नव्हते. पण या दिग्ग्ज बॉलिवूड कलाराने शिफारस केल्यामुळे त्यांनी चित्रपटात काम करण्यासाठी संमती दर्शवली, त्या कलाकाराचे नाव आहे अमीर खान.

आमिर खानला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ नावाने ओळखतात. कारण तो एक असा अभिनेता आहे जो त्याच्या असामान्य निवडी आणि चांगल्या अभिनयासाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत त्याने कोणाला काही सूचना दिल्यास त्याचे म्हणणे नक्कीच गांभीर्याने घेतले जाते. असेच काहीसे घडले ‘झुंड’ सिनेमाच्याबाबतीत.

आमिर खानने ‘झुंड’ या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना शिफारस केली. शिफारस करून तो तेवढ्यावरच थांबला नाही तर सिनेमासाठी प्रमुख भूमिका करण्यासाठी त्यांना तयार देखील केलं. ‘झुंड’ फ्लोअरवर येण्याच्या खूप आधी आमिरने चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली होती आणि त्यानंतर तो इतका प्रभावित झाला की त्याने थेट बॉलीवूडच्या शहनशहाला हा चित्रपट करण्याचा सल्ला दिला.

आमिरला असं वाटतं होतं की, अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच व्यक्ती या सिनेमाला न्याय देऊ शकत नाही. अमिताभ बच्चन म्हणाले की,’मला आठवतंय जेव्हा मी आमिरशी याबद्दल चर्चा केली तेव्हा त्याने मला हा चित्रपट करायला हवा असं सांगितलं आणि जेव्हा आमिर एखाद्या गोष्टीला मान्यता देतो तेव्हा काय होतं ते तुम्हाला माहिती आहे.”

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.