बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला भरत जाधवच्या ‘या’ नाटकात करायचंय काम, म्हणाली; नाटकात काम करण्यासाठी…

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला भरत जाधवच्या ‘या’ नाटकात करायचंय काम, म्हणाली; नाटकात काम करण्यासाठी…

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत की, ज्यांच्या सोबत काम करायला अनेक अभिनेत्रींची इच्छा असते. मात्र, सगळ्यात अभिनेत्रींना त्या अभिनेत्यांसोबत काम करता येत नाही. असाच एक अभिनेता म्हणजे भरत जाधव. भरत जाधव याच्यासोबत काम करण्यास अनेक अभिनेत्री खूप उत्सुक असतात.

आता देखील एका अभिनेत्रीने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने आपल्याला भारत जाधव याच्यासोबत काम करायचे होते, असे सांगितले आहे. भरत जाधव हा मराठीतील दिग्गज अभिनेता आहे. सध्या भरत जाधव हा अधिक प्रमाणात सक्रिय नसला तरी अधून मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.

भरत जाधव याने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमधून आपल्या भूमिका जागवल्या आहेत. त्याला भरभरून रसिकांनी प्रेम देखील दिले आहे. मात्र, खऱ्या अर्थाने त्याला ‘सही रे सही’ या नाटकातूनही ओळख मिळाली. या नाटकाचे आजूनही प्रयोग होत असतात. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. केदार शिंदे यांच्या अनेक चित्रपटात भरत जाधव दिसला आहे.

दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांच्या वास्तव या चित्रपटामध्ये भरत जाधव याने छोटी भूमिका केली होती. त्याचप्रमाणे मांजरेकर यांच्या अनेक चित्रपटात तो दिसला आहे. भरत जाधव नाटकांमधून जास्त रमत असल्याचे दिसते. श्रीमंत दामोदर पंत हे त्याचे हे नाटक प्रचंड गाजले होते. मात्र, सही रे सही हे नाटक त्याचे लोकप्रिय ठरले.

आता देखील मराठीतील एक दिग्गज अभिनेत्री भरत जाधव याच्यासोबत काम करायचे होते, असे सांगून गेली आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर या अभिनेत्रीचे नाव आहे शर्वरी वाघ. शर्वरी वाघ ही सध्या प्रचंड च’र्चेत आलेली आहे. द फॉर्गटन आर्मी ही तिची वेब सिरीज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय असते. सोशल मीडियावर आपले हॉ’ट फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर करत असते. शर्वरी वाघ हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने आपल्याला काय आवडते, काय नाही याबद्दल खुलासा केला आहे. शर्वरी वाघ हिने बंटी और बबली 2 चित्रपटातही काम केले.

शर्वरी वाघ हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने अनेक बाबींचा खुलासा केला आहे. सुरुवातीला चित्रपटामध्ये करिअर करण्यासाठी मी अतिशय धडपड होते. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी काम केलं आहे. मात्र, मला अभिनय करायचा होता. सुरुवातीची काही वर्षे माझे ऑडिशनमध्ये गेले. त्यानंतर मी अनेक जाहिरातींमधून काम केले.

त्यानंतर मला बंटी और बबली 2 हा चित्रपट मिळाला, असे तिने सांगितले आहे. त्यानंतर सर्व तिने सांगितले की, मला लहानपणापासून नाटकांमध्ये काम करायला आवडते. लहानपणापासून सही रे सही हे नाटक मला प्रचंड आवडते. भविष्यामध्ये नाटकात छोटी भूमिका साकारायला भेटावी, असे माझे स्वप्न आहे.

तर सही रे सही या गाजलेल्या नाटकात अभिनेता भरत जाधव याची भूमिका आहे. त्याच्यासोबत देखील मला काम करायला आवडेल, असे तिने सांगितले आहे. विशेष म्हणजे शर्वरी वाघ हिला चित्रपटसृष्टीची कुठलीही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे तिने मिळालेले यश हे खूप मोठे आहे, असे देखील अनेक जण मानतात.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.