बॉलिवूडचा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला पिता, घरी झालं गोंडस परीचं आगमन…

बॉलिवूडचा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला पिता, घरी झालं गोंडस परीचं आगमन…

नुकतंच काही दिवसांपूर्वी लग्नसराई संपली. यंदाच्या लग्नाच्या मोसमात अनेक सेलेब्रिटी जोड्या विवाह बंधनात अडकल्या. सगळीकडेच या सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा आपण पहिली. मात्र, त्याचसोबत अनेक सेलेब्रिटीजच्या घरातून गोड बातम्या ऐकायला मिळाल्या. अनेक सेलेब्रिटीजने लवकरच आपण आई-वडील होणार असल्याची बातमी दिली.

काहीच दिवसांपूर्वी गायक आदित्य नारायणने आपण लवकरच वडील होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्याचसोबत, प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह देखील ग’रोद’र आहे. तिच्या प्रे’ग्नसीच्या बा’तमीने सो’शल मी’डियावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव सुरु होता. तिच्या पाठोपाठ, साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल देखील लवकरच आई होणार असल्याची आनंदवार्ता समोर आली.

भारती सिंह आणि काजल अग्रवाल यांच्या घरी पाळणा हलण्यासाठी अजून थोडा काळ बाकी आहे. पण नुकतंच एका सेलेब्रिटी जोडप्याच्या घरी गोंडस बाळाचा जन्म झाला आहे. याचाच अर्थ, बॉलीवूडचे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक उदित नारायण आता आजोबा झाले आहेत. छोट्या पाहुण्याच्या आगमनाने संपूर्ण कुटुंब अत्यंत आनंदित आहे.

आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल २०२० मध्ये लग्नबेडीत अडकले होते. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडियावरून आदित्यने, पत्नी श्वेतासोबतचा एका फोटो शेअर करत लवकरच ते आई-वडील होणार असल्याची बातमी दिली होती. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहिती नुसार, श्वेता अग्रवालने २४ फेब्रुवारी रोजी एका सुंदर आई गोंडस अशा बाळाला जन्म दिला.

त्याबद्दलची एक पोस्ट स्वतः आदित्यने आपल्या सोशल मीडियावरून शेअर केली आहे. संपूर्ण कुटुंबाचा आनंद या बाळाच्या आगमनामुळं गगनात मावेनासा झाला आहे. आदित्यच्या पोस्टवरून त्यांच्या आनंदाचा अंदाजा लावला जाऊ शकतो. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे की, ‘मी आणि माझी श्वेता अगदी धन्य झालो आहोत. आमचं सौभाग्य, एका सुंदर अशा परीने आमच्या घरी जन्म घेतला आहे.

आमच्या कन्यारत्न बद्दल सांगताना खरं तर आमच्या आनंदाला पारावरच उरला नाहीये.’ आदित्यची ही पोस्ट बघून, चाहते त्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. एका मुलाखती दरम्यान आदित्यने सांगितले की,’माझी पत्नी जेव्हा मुलीला जन्म देत होती, तेव्हा मी तिच्यासोबतच होतो. आई होताना किती वेदना होतात, किती त्रास होतो, हे बघून मी सुद्धा भावुक झालो.

तिला या अवस्थेत बघून माझ्या मनातील तिच्याबद्दल असलेले प्रेम आदर आता द्विगुणित झाला आहे. मात्र एका गोष्टीबाबत श्वेता नाही तर माझी इच्छा पूर्ण झाली. श्वेताकडे बघून सगळे बोलत होते की, तिला मुलगाच होणार. ते ऐकून श्वेताला देखील आपल्याला मुलगाच होईल असं वाटत होत.

पण मी मनातून देवाकडे प्रार्थना करत होतो की, मला मुलगीच व्हावी.आणि देवाने माझी इच्छा पूर्ण केली. मुलगी म्हणून एक सुंदर परी आमच्या घरी आली.’ आदित्य नारायण सोबतच, नेटिझन्स उदित नारायण यांच्यावर देखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.