“बेशरम रंग” गाण्यातील अश्लील हावभाव करणे दीपिकाला पडले महागात, सेन्सॉरनं उचलले मोठे पाऊल

“बेशरम रंग” गाण्यातील अश्लील हावभाव करणे दीपिकाला पडले महागात, सेन्सॉरनं उचलले मोठे पाऊल

सोशल मीडियावर सध्या शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचीच चर्चा होताना दिसत आहे. ५ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर शाहरुख खान पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करत आहे. पण प्रदर्शित होण्यापूर्वीच शाहरुख खानचा पठाण चित्रपट वा’दाच्या भवऱ्यात सापडला आहे.

अनेक वर्षांच्या कालावधीनंतर शाहरुख खान पठाण या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुनरागमन करत आहे. पण हा चित्रपट वादात सापडल्याने याची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्याला कारण आहे या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं. दीपिका आणि शाहरूख खानवर तयार झालेल्या या गाण्यात दीपिकाने अतिशय हॉट डान्स केला आहे.

पण या चित्रपटाला विरोध करण्याचे कारण दीपिकाचा डान्स नाही तर डान्स करताना तिने घातलेल्या भगव्या रंगाची बि’किनी आहे. हो तुम्ही बरोबर ऐकलं. दीपिकाने फक्त भगव्या रंगाची बि’किनी घातल्याने एवढा विरोध या चित्रपटाला होताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील याच गाण्याची आणि या मुद्यांची चर्चा होताना दिसत आहे.

तसेच या चित्रपटाला देखील बॉयकट करण्याची मागणी सोशल मीडियावर उठत आहे. अनेक हिंदू संघटनांनी याला विरोध दर्शविला आहे. मात्र तरीही हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपटात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी दीपिकाला बेशरम रंग गाण्यामुळे चांगलाच मनस्ताप झाल्याचे बघायला मिळत आहे.

चित्रपटाला विरोध झाल्यामुळे सोशल मीडियावर असे अनेक बातम्या व्हायरल होता होत्या. ज्यामध्ये कधी चित्रपटाचे नाव बदल्यांत येईल तर कधी दीपिकाच्या बिकिनीचा रंग बदलण्यात येईल. मात्र आता या चित्रपटाविषयी मोठी बातमी समोर येत आहे की चित्रपटावर सेंसर बोर्डानं काही कट्स सांगितले आहेत.

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन नं शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटात काही बदल करण्यास सुचवले होते. त्यात कॉन्ट्रोवर्सियल सॉन्ग ‘बेशरम रंग’ मध्ये बदलाव करण्यास सांगितले आहे. यावेळी डायलॉग बदलण्यासोबत सीन्समध्ये बदल पर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या चित्रपटासाठी सेंसर बोर्डानं 10 पेक्षा जास्त कट सांगितले आहेत.

बॉलिवूड हंगामानं दिलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेन्सॉर बोर्डाने चित्रपट पाहिल्यानंतर निर्मात्यांना काही कट आणि काही बदल सुचवले आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीला कर्नल लुथरा यांच्या डायलॉगमधून ‘रॉ’ हा शब्द काढून त्या जागी ‘हमारे’ या शब्दाचा वापर करण्यास सांगितले आहे.

यासोबतच आणखी एका डायलॉगमध्ये स्वस्त स्कॉच मिळाली नाही, तर स्कॉचऐवजी ड्रिंक्स वापरण्यास सांगितले आहे. तर दुसऱ्या डायलॉगमध्ये रशियाचा संदर्भ काढून टाकण्यास सांगितले आहे. इतर डायलॉग्समध्ये, मिसेस भारतमाता ऐवजी हमारी भारमाता असे करण्यास सांगितले आहे.

रिपोर्ट्सनुसार, सेंसर बोर्डानं या गाण्यातील बोल्ड, क्लोजप, साइड पोज आणि बहुत तंग किया या गाण्याच्या लाइन दरम्यान, दीपिकानं केलेले सेन्शुअल डान्स स्टेप काढून टाकण्यास सांगितले आहे. तर त्याजागी शोभतील अशा स्टेप करण्यास सांगितले आहे.

तर आता सगळ्यांना प्रश्न आहे की दीपिकाच्या भगव्या बि’कीनीवर आक्षेप घेतल्यानंतर त्यावर सेंसर बोर्डानं काय निर्णय घेतला आहे. दरम्यान, हे सगळे बदल केल्यानंतर एडिट केल्यानंतर रिव्हाइज कॉपी पुन्हा पाठवण्यास सांगितले आहे. दरम्यान, अजूनही या चित्रपटाबाबत होणाऱ्या बातम्या बंद होण्याचे नाव घेत नाहीये..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12