बेबी शॉवरमध्ये प्रे’ग्नंट महिलेने पतीसोबत केला भन्नाट डान्स, Video सोशल मीडियावर होतोय व्हायरल..

अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण वेगवेगळे व्हिडियोज शेअर करत असतात. जेव्हा हे व्हिडियोज थोडे हटके असतात, त्यावेळी असे व्हिडियोज सगळीकडेच वायरल होतात. खास करुन डान्सचे व्हिडियोज तर हमखास वायरल होतात. कार्यक्रमामध्ये सुरु असणारे व्हिडियोज कायमच हटके आणि मजेशीर ठरतात.
तस तर आपल्या देशात कोणताही खास कार्यक्रम असो, नाच-गाण्याशिवाय पूर्ण होतच नाही. लग्न असोत, बारसा, कुणाचा वाढदिवस किंवा आणखी काही, गाणं लावलं नाही, तर मजाच नाही. अशा कार्यक्रमामध्ये नक्कीच असे काही भन्नाट मंडळी देखील असतात, जे कोणतंही गाणं किंवा म्यूजिक ऐकून भान सोडून नाचू लागतात.
त्यावेळी त्यांच्या डान्स मुव्ह्ज नक्कीच विनोदी आणि सर्वाचं मनोरंजन करणारे ठरतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. डोहाळ जेवणाचा कार्यक्रम कोणत्याही महिलेसाठी नक्कीच अत्यंत खास असते, यात काहीच वाद नाही. या कार्यक्रमाच्या वेळी, त्या महिलेच्या चेहऱ्यावरचा ग्लो आणि आनंद कमालीचा असतो.
अशा कार्यक्रमामध्ये, त्या महिलेच्या कुटुंबीयांचं, म्हणजेच बहीण, मैत्रीण यांचा डान्स अगदी साधारण बाब आहे. मात्र, स्वतः गरोदर असणारी महिला उठून डान्स करताना तुम्ही पहिली आहे का? होय सध्या असाच एक व्हिडियो सगळीकडेच वायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक गर्भवती महिला त्याच्या पतीसोबत भन्नाट डान्स करत आहे.
यावेळी तिचे नातेवाईक आणि मित्रपरिवार आजूबाजूला उभे आहेत. जोरदार संगीत सुरू आहे आणि आपल्या पतीसोबत ती या गाण्यावरती नाचत आहे. सध्या इंस्टाग्राम वर या व्हिडिओने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘बेबी शॉवर,’ असं कॅप्शन टाकत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गर्भवती महिला नाचत आहे आणि ती यावेळी खूपच जास्त आनंदी आहे.
यावेळी तिचा नवरा देखील स्टेप बाय स्टेप आपल्या पत्नीला फॉलो करत असल्याचे दिसत आहे. दोघांचा डान्स बघून कुटुंबीय कमालीचे आनंदी असल्याचे दिसत आहे. बॅकग्राऊंड मध्ये ‘तु मान मेरी जान’ हे गाणे वाजत आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
व्हिडिओमध्ये महिलेने पिवळ्या रंगाची साडी घातलेली असून ती अगदी बिनधास्त होऊन आपल्याच बेबी शावर सेरेमोनी मध्ये डान्स करत आहे. तिचा उत्साह बघून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. सोशल मीडिया वरती या व्हिडिओ वरती लाईक्सचा वर्षाव होत आहे.