बिपाशाने केला मोठा खुलासा! म्हणाली, ‘प्रेग्नन्सीच्या दिवसात मी बाथरूम आणि बेडवर नेहमी…’

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू सुरुवातीपासूनच चर्चेत असते. अभिनय क्षेत्रात प्रवेश केल्या नंतर पासूनच बिपाशा कायम वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे पाहिलं गेलं आहे. बिपाशाशी निगडित प्रत्येक गोष्ट नक्कीच मोठी बातमी बनते. तिचे वैयक्तिक आयुष्य देखील कायम चर्चेचा मुद्दा ठरला.
बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांनी 30 एप्रिल 2016 रोजी एकमेकांशी लग्न केले. लग्नाच्या सुमारे सहा वर्षानंतर या जोडप्याने पालकत्वाकडे पाऊल टाकले. करण आणि बिपाशा यांनी 2022 मध्ये सांगितलं होत की बिपाशा गर्भवती आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर तिने आपल्या मुलीला जन्म दिला आहे.
काही डॉक्टरांनी तर तिला आई होऊ शकत नसल्याचे सांगितलं होतं. त्यामुळे अभिनेत्रीने आई बनण्याच्या अशा सोडल्या होत्या, असं तिने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं. मात्र डॉक्टरांच्या योग्य उपचाराने वयाच्या 43 व्या वर्षी बिपाशा आई बनली आहे.
12 नोव्हेंबर 2022 रोजी बिपाशाने देवी बासू सिंग ग्रोव्हर या मुलीला जन्म दिला. बिपाशाने आपल्या मुलीचे नाव ‘देवी’ असं ठेवलं आहे. बिपाशाने आपल्या मुलीची एक झलक देखील तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली. प्रेग्नेंसीदरम्यान बिपाशाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागले.
याबद्दल नुकतंच एका मुलाखतीमध्ये बिपाशाने सांगितलं आहे. बिपाशाने तिला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि दररोज कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे या मुलाखतीमध्ये सांगितले. बिपाशा बसूने सांगितले होते की, गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात ती खूप आळशी बनली होती.
त्यादरम्यान तिने जास्त हालचाल केली नाही. तिला दिवसभर मॉर्निंग सिकनेस होता, त्यामुळे तिला या सर्व समस्यांना तोंड द्यावं लागलं. याबद्दल सांगताना बिपाशाने म्हणले की, तिच्या गरोदरपणाचे सुरुवातीचे महिने खूप कठीण होते. तिला दिवसभर विचित्र वाटायचे. संपूर्ण दिवस ती अंथरुणावर किंवा बाथरूममध्ये घालवायची.
बिपाशाने मुलीला जन्म दिल्यापासून अनेकांना बिपाशाची प्रसूती नॉर्मल आहे की सी-सेक्शन हे जाणून घ्यायचे होते. मात्र बिपाशाने याबद्दल काहीच खुलासा केला नाही. दरम्यान, बिपाशाने आपल्या गरोदर पणात चांगलीच चर्चा रंगवली होती. कधी अति बोल्ड फोटोशूट, तर कधी पार्टीमध्ये बिनधास्त डान्स यामुळे गरोदरपणात बिपाशा चर्चेत राहिली.