बिग बॉसमध्ये कट्टर दुष्मन असणारे किरण-अपूर्वा आता पुन्हा दिसणार एकत्र! दोघेही साकारणार महत्वाची भूमिका..

बिग बॉस मराठीचे पर्व आता संपले आहे. असं असलं तरीही चाहत्यांना अजूनही त्याची भुरळ पडलेलीच दिसत आहे. यंदाच्या बिग बॉस मराठीच्या पर्वाने अक्षरशः धुमाकूळच घातला होता. विशेष म्हणजे घरात आलेल्या प्रत्येक सदस्याने आपल्या चाहत्यांची मनावर खास छाप सोडली आहे.
खरं तर, बिग बॉस हा शो यासाठीच प्रसिद्ध आहे. आणि असंच काही सर्वच स्पर्धकांबद्दल पाहायला मिळालं. त्यात किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर हे दोघे तर सध्या लोकप्रियतेच्या शिखवरच पोहोचले आहेत. किरण माने यांचे डाव पेच आणि मेंदूचा वापर करत खेळण्याची लकब यामुळे त्याचा खास आणि मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
तर दुसरीकडे रोखठोक आणि स्पष्टपणे बोलणारी अपूर्वा देखील या सीझनच आकर्षण ठरली. अपूर्वा नेमळेकरने आपला खेळ स्वतःच्या मर्जीने खेळला. आपल्या खेळाच्या मध्ये तिने कोणतेही नाते, किंवा इतर कोणतीच बाब येऊ दिली नाही. विशेष म्हणजे महेश मांजरेकर यांनी दिलेल्या सल्ल्याकडे तर तिने जाणून बुजून दुर्लक्ष केलं.
असं असलं तरीही ती शोची उपविजेती ठरली. किरण माने आणि अपूर्वा दोघांचंही घरामध्ये अजिबात पटलं नाही. दोघांचा देखील एकमेकांसोबत सतत वाद सुरु होता. मात्र शोच्या अखेरच्या टप्प्यात दोघांची चांगलीच मैत्री जुळली. एकूणच हे दोघे बिग बॉसच्या घरातील सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेले स्पर्धक आहेत.
या दोघांनी मिळून बिग बॉसचं पर्व गाजवलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आता हे दोघे पुन्हा एकद एकत्र येत आहेत. एका खास प्रोजेक्टसाठी अपूर्वा आणि किरण एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच ‘रावरंभा’ या चित्रपटच पोस्टर प्रदर्शित झालं आहे. याच ऐतिहासिक चित्रपटामध्ये अपूर्व आणि किरण सोबत झळकणार आहेत.
झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी मालिकेतील अभिनेता या चित्रपटामध्ये ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या चरित्रावर आधारित आहे. त्यांची एक लक्षवेधी झलक देखील समोर आली होती. अभिनेते अशोक समर्थ या चित्रपटामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.
आजवर अशोक समर्थ यांनी हिंदी, मराठी सिनेमांमध्ये आपली छाप उमटवली आहे. अभिनेते अशोक समर्थ नुकतेच झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी मालिकेत झळकले होते. त्यांची या मालिकेत त्यांनी अनामिकाच्या नवऱ्याची आकाश जोशीची भूमिका साकारली होती.
त्यांच्या सोबत आता, बिग बॉस मधून चाहत्यांना भुरळ घालणारे किरण माने आणि अपूर्व नेमळेकर देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. हि माहिती समोर येताच, चाहत्यांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे.
हा सिनेमा जरी ऐतिहासिक असला तरी ‘रावरंभा’चे नेमके कथानक काय आहे ? याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. किरण माने – अपूर्वा नेमळेकर या दोघांच्या भूमिका नेमक्या काय असणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.