बिग बींच्या फोनमध्ये ‘या’ नावानं सेव्ह आहे जया बच्चन यांचा नंबर, वाचून चकित व्हाल..

बिग बींच्या फोनमध्ये ‘या’ नावानं सेव्ह आहे जया बच्चन यांचा नंबर, वाचून चकित व्हाल..

बिग बी, अँग्री यंग मॅन, बॉलिवूडचे महानायक अशा बिरुदावल्या ज्यांना दिल्या जातात, ते अमिताभ बच्चन या वयातही अगदी उत्साहाने कार्यरत आहेत. त्यामुळेच अगदी तरुण पिढीच्या दिग्दर्शकांच्या नव्या सिनेमांसह जाहिराती आणि ‘कौन बनेगा करोडपती’सारख्या कार्यक्रमांतून टीव्हीवरही ते प्रचंड ऊर्जेने वावरताना दिसत आहेत.

त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला रेडिओवरच्या ऑडिशननंतर त्यांना नकार मिळाला होता तिथपासून ‘कूली’च्या सेटवर त्यांना झालेला जीवघेणा अपघात, सुपरस्टार झाल्यानंतर अलीकडच्या काळात बिकट झालेली आर्थिक परिस्थिती आणि त्यानंतर जिद्दीने त्यावर मात करून पुढे आलेले बिग बी अशा त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच घटना त्यांच्या चाहत्यांना माहिती आहेत. अमिताभ यांनी शेतकऱ्यांना केलेली मदत, तसंच कोविड काळात केलेली मदत वगैरेंबद्दलही ते चर्चेत असतात.

जया बच्चन यांच्यासोबतचं त्यांचं प्रेम आणि नंतर त्यांच्याशी झालेला विवाह या गोष्टीही त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर करून राहिलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल जी काही नवीन माहिती मिळेल, ती घेण्यास चाहते उत्सुक असतात. शिवाय अमिताभ बच्चन वेळोवेळी ब्लॉग लिहितात, आपले वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कविता शेअर करतात, तसंच सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असतात, जुने फोटो किंवा किस्से शेअर करतात.

या सगळ्यामुळे ते कायम चर्चेत असतात. काही कालावधीपूर्वी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अमिताभ यांनी जया यांच्याबद्दल एक गोष्टी सांगितली होती. जया यांचं नाव त्यांनी मोबाइलमध्ये काय नावाने सेव्ह केलं आहे, याबद्दल त्यांनी सांगितलं होतं. ‘जागरण डॉट कॉम’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

2019मध्ये कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा 11वा सीझन सुरू होता. त्या वेळी उत्तराखंडमधून आलेला सुमित तडियाल नावाचा एक स्पर्धक अमिताभ यांच्यासमोर होता. सगळ्या चाहत्यांना असतात, तसेच सुमित यांनाही अमिताभ यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुतूहल असणारे अनेक प्रश्न मनात होते.

ते प्रश्न सुमित यांनी अमिताभ यांना विचारले आणि अमिताभ यांनीही त्या प्रश्नांना मजेशीर उत्तरं दिली. अमिताभ यांनीही सुमित यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले. त्याला सुमित यांनीही मजेशीर उत्तरं दिली.

पत्नीसोबत घरी कसे राहता, असा प्रश्न विचारल्यावर सुमित यांनी सांगितलं होतं, ‘भांड्याला भांडं लागणारच. तसंच, आमच्यात बरीच भांडणं होतात.’ सुमित यांच्या पत्नीला अमिताभ यांनी विचारलं, की त्या पतीला कोणत्या नावाने हाक मारतात. त्यावर आपण त्यांना नावानेच हाक मारत असल्याचं त्यांनी सांगितलं.

यानंतर सुमित यांनी लगेचच सांगितलं, की ‘सुनती हो’ या नावानेच आपण पत्नीचा नंबर मोबाइलमध्ये सेव्ह केला आहे. त्यानंतर अमिताभ यांनी सांगितलं, की ‘मी जया यांचा नंबर माझ्या मोबाइलमध्ये JB या नावाने सेव्ह केला आहे; आता मात्र तुमच्यापासून प्रेरमा घेऊन मी तिचा नंबर ‘सुनती हो’ या नावाने सेव्ह करणार आहे.’ अमिताभ यांच्या वक्तव्यानंतर केबीसीच्या सेटवर खसखस पिकली नसती, तरच नवल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12