बाहुबलीमधील देवसेनेला प्रभासपेक्षाही जास्त आवडतो ‘हा’ भारतीय क्रिकेटपट्टू, म्हणाली लग्नापूर्वीच मला त्याच्या सोबत एकदा तरी…

एस एस राजामौलींच्या बाहुबली या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि दाक्षिणात्य अभिनेता प्रभास एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. प्रभास आणि अनुष्का ही जोडी मोठ्या पडद्यावर जितकी गाजली तितक्याच त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चां देखील गाजल्या.
प्रभाससोबत अनुष्काचे नाते कसे आहे, याबद्दल ठामपणे फार काही सांगता येणे कठीण आहे. पण एका मुलाखती मध्ये अनुष्काने सांगितले की ती एका भारतीय खेळाडूवर खूप प्रेम करते, त्याच्याशीच लग्न करण्याची तिची इच्छा होती. तर हा भारतीय खेळाडू दुसरा कोणी नसून भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आहे.
अनुष्काने याचा खुलासा काही वर्षांपूर्वी एंटरटेनमेंट पोर्टल च्या तेलुगु कर्मचार्यांना दिलेल्या मुलाखतीत केला होता. या मुलाखती दरम्यान तिचे अनेक चाहतेही उपस्थित होते. या सर्व प्रेक्षकांमधील एका चाहत्याने अनुष्काला विचारले की तुम्हाला कोणता भारतीय क्रिकेटपटू सर्वात जास्त आवडतो.
हा प्रश्न विचारल्यावर तिच्या चेहऱ्यावर लगेच हास्य दिसले आणि ती चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाली, राहुल द्रविड हा माझा आवडता क्रिकेटपटू आहे. मी कॉलेजला असल्यापासून राहुल द्रविड मला खूप आवडत असे. मी त्याच्याकडे फार आकर्षित झाले होते आणि एक वेळ असा होता की मी त्याच्यावर प्रे’म करू लागले होते.
पण बाहुबलीच्या यशानंतर अनुष्का आणि प्रभासच्या अफेअरविषयी बर्याच बातम्या येत होत्या. पण या दोघांपैकी कोणी कधीही त्यांच्या अ’फे’यरविषयी किंवा दोघांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलले नाही. बाहुबली च्या अगोदरही अनुष्का आणि प्रभास यांनी ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली आहे.
अनुष्का शेट्टी बाहुबली चित्रपटानंतर साउथ मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री ठरली आहे. सध्या या अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत. याशिवाय अनुष्काने लिं-ग, रुद्र देवी, सिंघम -१, भगवती इत्यादी अनेक साउथ चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. अनुष्का शेट्टी दिसण्यात बरीच सुंदर आणि आकर्षक आहे.
सध्या एका चित्रपटासाठी ती अडीच ते तीन कोटी दरम्यान शुल्क आकारते. बाहुबली चित्रपटात तिने अमरेंद्र बाहुबलीच्या पत्नीची भूमिका केली होती आणि अमरेंद्र बाहुबली ही भूमिका दक्षिण भारतातील सुपरस्टार प्रभासने साकारली होती. बाहुबली हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय ठरलेला चित्रपट आहे.
ही काय पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या अभिनेत्रीने राहुल द्रविडला आपले प्रेम म्हणले आहे, तर काही वर्षापूर्वी देखील कॅटरिना कैफने देखील एका मुलाखतीत राहुल द्रविडचे नाव घेतले होते. एका मुलाखतीत जेव्हा कतरिनाला तिच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल विचारले गेले तेव्हा ती म्हणाली, मला राहुल द्रविड खूप आवडतो.
तो खरोखर एक सज्जन माणूस आहे. राहुल कधीही आक्रमक, चिडलेला किंवा निराश नसतो. आजपर्यंत मी त्याच्याशी तीनपेक्षा जास्त शब्द बोललो नाही आणि तो फार लाजाळू नाही. आपणास माहितीच आहे की द वॉल म्हणून ओळखले जाणारा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड सर्वानाच आवडतो.
राहुल द्रविडने त्याच्या खेळासह त्याच्या जेंटलमॅन पर्सनालिटीने आपल्या चाहत्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतले होते. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि त्यावेळी अडचणीत आलेल्या भारतीय क्रिकेटला द्रविडने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये बर्याच वेळा विजय मिळवून दिला होता.
जरी तो आज खेळाच्या मैदानापासून दूर गेला असेल, तरीही त्याच्यावर अजूनही भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये समान भावना आणि प्रेम असल्याचे बघायला मिळते. त्याच्या संयमी खेळीमुळे ओळखल्या जाणारा द्रविड अनेक युवा क्रिकेटपटूंसाठी आदर्श आहे. इतकेच नव्हे तर, भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात ऋषभ पंत, संजू सॅमसन या तरूण क्रिकेटपटूंना संधी देण्यातही द्रविडचा मोलाचा वाटा असल्याचे म्हटले जाते.