बाब्बो ! मॅगी खाऊन दिवस काढणाऱ्या पांड्या बंधूनी मुंबईत खरीदी केले आलिशान घर, किंमत एवढी की वाचुन चकित व्हाल…

बाब्बो ! मॅगी खाऊन दिवस काढणाऱ्या पांड्या बंधूनी मुंबईत खरीदी केले आलिशान घर, किंमत एवढी की वाचुन चकित व्हाल…

हार्दिक पांड्या हा अतिशय बिनधास्त असा खेळाडू आहे. त्याप्रमाणे त्याचा भाऊ कुणाल पांड्या देखील आक्रमक खेळाडू आहे. दोन्ही भावांनी आजवर क्रिकेटमध्ये अनेक आक्रमक खेळी करून सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. असे असले तरी हार्दिक पांड्या हा काही वर्षांपूर्वी वा’दात अडकला होता. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर कारवाई देखील केली होती.

हार्दिक पांड्या याने नताशा या मॉडेल सोबत लग्न केले आहे. तीदेखील आपले हॉ’ट फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असते. या फोटोवर अनेक जण लाईक देखील करत असतात. काही दिवसांपूर्वी हार्दिक आणि कुणाल पांड्या ने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही आपल्या पत्नीसोबत दिसत आहेत.

हार्दिक पांड्या सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आल्याचे बघायला मिळत आहे. त्याच्याकडे भारतीय संघाची धुरा देण्यात आली होती तेव्हा देखील त्याने चमकदार कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून दिला होता. हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व केलं होत आणि त्यामध्ये तो यशस्वी झाल्याचे बघायला मिळत आहेत.

बीसीसीआय त्याच्याकडे पुढे चालून T२० चे कर्णधार पद देऊ शकते यात शंका नाही. कारण हार्दिक आयपीलमध्ये गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व करतो आणि आयपीलच्या पहिल्याच हंगामात त्याने फायनल जिंकून आपला ठसा उमटविला आहे. त्यामुळे तो कर्णधार होईल यामध्ये शंका नाही.

मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याने पाहिजे तशी कामगिरी गेली नव्हती विश्व चषक स्पर्धेमध्ये देखील त्याची कामगिरी निराशाजनक होती. त्यावेळी त्याच्यावर मोठ्या प्रमाणत ठीक करण्यात आली होती. मात्र आता त्याने त्याच्या कामगिरीने त्याच्यावर टीका करणाऱ्याचे तोंड कायमचे बंद केले आहे.

तसेच हार्दिक आता फक्त फलंदाजी नाही तर आधी सारखी बॉलिंग देखील करत आहे, आणि त्यामध्ये तो यशस्वी देखील होत आहे. मात्र आता हार्दिक पंड्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसापूर्वी हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या यांनी तब्बल 8 बीएचके असलेला फ्लॅट खरेदी केला आहे.

आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. हा फ्लॅट तब्बल 3 हजार 838 स्क्वेअर फुट मध्ये विस्तारलेला आहे. या दोघांच्या फ्लॅटमध्ये स्विमिंग पूल, गेमिंग झोन आणि मिनी थेटर देखील असल्याचे सांगण्यात येते. या फ्लॅटची किंमत तब्बल तीस कोटी रुपये असल्याचेही सांगण्यात आले आहे.

आणि विशेष म्हणजे हार्दिक आणि कुणाल पांड्या यांच्या शेजारी टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी हे दोघेही राहतात. त्यामुळे त्यांचा शेजार आता या दोघांना. लाभणार आहे. आपल्याला दोन्ही खेळाडू आवडतात का? आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12