फोटोत दिसणाऱ्या मुलाला ओळखले का ? आज आहे बॉलीवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार आज एका चित्रपटासाठी घेतो २५ करोड रुपये….

कठोर परिश्रम आणि मेहनतीचे फळ अखेरीस मिळतेच, योग्य वेळी धैर्य आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत. बॉलिवूड ही अशी जागा आहे जी एका सामान्य माणसाला रस्त्या’वरून मोठ्या राजमहालापर्यंत पोहचू शकते.
याच बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी कधी काळी चित्रपटात एका सामान्य लहान मुलाची भूमिका साकारली आणि आज तीच मुले मोठी होवून आता करो’डो कमावत आहेत. ज्या कलाकाराबद्दल आपण बोलत आहोत तो म्हणजे अजय देवगन. तो खऱ्या आयुष्यात शांत स्वभावाचा व्यक्ती आहे.
पण त्याला बॉलीवूडचा सिंघम म्हणून ओळखले जाते. आज अजय देवगण बॉलीवूड अभिनेता, चित्रपट निर्माता तसेच दिग्दर्शक आहे. वर्ष १९९१ सालच्या फूल और कांटे या चित्रपटापासून त्याने आपल्या चित्रपटाच्या प्रवासाची सुरुवात केली होती.
तसेच वर्ष १९९९ मध्ये महेश भट्ट दिग्दर्शित जखम या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. राजकुमार संतोषी यांनी २००२ मध्ये अजय देवगनला घेवून दि लिजेंड ऑफ भगतसिंग दिग्दर्शित केला जो सुपरहिट ठरला.
अजयचे वडील वीरू देवगन हिंदी चित्रपटात एक स्टंटमॅन होते. अजयची आई वीणा देवगन यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. आजच्या काळात अजय देवगणकडे चित्रपटांची कमतरता नाही, तो स्वत: एका चित्रपटातून को’ट्यावधी रुपये कमावतो. आज त्याची लोकप्रियता इतकी जास्त आहे की तो प्रत्येक चित्रपटासाठी 25 को’टी रुपये घेतो.
अजय देवगण मागे वळून पाहण्यावर आणि भविष्याबद्दल जास्त विचार करण्यात विश्वास ठेवत नाही. त्याला सद्यस्थितीत वर्तमानात जगायला आवडते. अजय म्हणतो की त्याला स्टारडमचीही पर्वा नाही आणि हीच विचारसरणी त्याला वास्तवात जगण्यास मदत करते.
अजय देवगणने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “सुदैवाने मला आयुष्यात कधी संघर्ष करावा लागला नव्हता, सर्व काही व्यवस्थित झाले आहे. आतापर्यंतच्या प्रवासामधून मी जे शिकलो ते कठोर परिश्रम आहे. यासह, अजयने म्हटले आहे की मला स्वतःची इतरांशी तुलना करण्यात विश्वास नाही आणि मला मागे वळून पाहणेही आवडत नाही, परंतु तो आजच्या दिशेने पाहतो.
अजय देवगण मागचे 28 वर्ष चित्रपटसृष्टीत काम करत आहे आणि 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे अनेक प्रतिभांनी परिपूर्ण स्टार म्हणून त्याला ओळखले जाते. तो एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता असून त्याने मध्ये गाणेही गायले आहे.
या सर्व गोष्टींमुळे त्यांचा स्टारडम आणखी मजबूत होतो. काही चाहत्यांसाठी अजय हा बॉलिवूडचा एक सिरीयस अभिनेता आहे ज्याने दोन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. तर काहींसाठी तो एक हुशार अॅक्शन स्टार आहे. त्याचबरोबर काही लोक त्याला एक विनोदी हिरो देखील मा’नतात.
एका मुलाखतीमध्ये अभिनय सोडल्यानंतर पुढे काय करणार असा प्रश्न अजयला विचारण्यात आला होता. त्यावर अजयने त्याला निर्मिती क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे सांगितले. एका कलाकाराने कोणत्या वयापर्यंत काम करावं हे मी चांगल्या प्रकारे जाणतो.
काही वर्षांनंतर मला कोणत्याही चित्रपटामध्ये मुख्य भूमिका करण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे मला सहकलाकाराची वैगरे भूमिका साकारावी लागेल. त्यामुळेच माझं लक्ष निर्मिती क्षेत्रावर केंद्रित करायचा विचार आहे.