‘प्रेग्नेंसी’मुळे वाढलेल्या वजनाने आलियाला चालणेही झाले अवघड, रणबीरचा आधार घेऊन चालताना व्हिडिओ व्हायरल…

‘प्रेग्नेंसी’मुळे वाढलेल्या वजनाने आलियाला चालणेही झाले अवघड, रणबीरचा आधार घेऊन चालताना व्हिडिओ व्हायरल…

नव्या दमाची अभिनेत्री म्हणून आलिया भट्टने कायम स्वतःला सिद्ध केले आहे. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तीन बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली आणि त्यानंतर तिने कधीच माघे वळून पाहिलं नाही. एक उत्तम अभिनेत्री म्हणून आलीयाने कायमच स्वतःला सिद्ध केल आहे.

एक कमर्शियलच नाही तर क्रिटिक्स कडून देखील आलियाने अनेकवेळा आपल्या जबरदस्त अभिनयाने कौतुक कमवल आहे. आलियाला अनेकवेळा टीकेचा सामना देखील करावा लागला आहे. मात्र असं असलं तरीही तिने आपल्यावर होणाऱ्या टी’का देखील सकारत्मक दृष्टीने घेतल्या आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या आलिया ही सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून गणल्या जाते. आलिया हिचा गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट प्रचंड चालला. यासाठी ती रेड लाईट एरिया मध्ये गेली होती. राजामौलीच्या आरआरआर या चित्रपटात देखील ती झळकली आहे.

नुकतंच ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालं आहे. यामध्ये देखील तिच्या लूकची चांगलीच चर्चा सांगली आहे. विशेष म्हणजे याच चित्रपटाच्या दरम्यान आलिया आणि रणबीरला एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झाली. त्यामुळे या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री बघण्यासाठी चाहते चांगलेच आतुर आहेत.

परिणामी आज आलियाचा केवळ बॉलीवूडमधेच नाही तर साऊथ इंडस्ट्री आणि हॉलीवूडमध्ये देखील मोठा चाहतावर्ग आहे. आलिया नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील उघडपणे बोलत असते. एप्रिल महिन्यात नुकतंच आलिया आणि रणबीर लग्नबेडीत अडकले. त्यापूर्वी त्याच्या नात्याच्या देखील चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या.

आता आलीय गरोदर असल्याचा आनंद घेताना दिसत आहे. आलिया भट्टने अगदी काहीच महिन्यांपूर्वी आई होण्याची बातमी शेअर केल्यावर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं. आलिया प्रे’ग्नन्ट असतानाही स्वतःची योग्य काळजी घेत फुल फॉर्मात कामावर लक्ष केंद्रित करताना दिसून आली होती. नुकतीच आलिया तिचा नवरा रणबीर सह एका प्रमोशन इव्हेंटला जाताना दिसून आली होती.

आलियाच्या या फोटोमध्ये तिचा बेबी बम्प साफ दिसत असून तिच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळाच ग्लो बघायला मिळत आहे. चाहत्यांनी आलिया आणि रणबीर यांच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला असून या दोघांचे क्युट फोटो सध्या viral होताना दिसत आहेत. आलियाने ब्राऊन रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे तर रणबीर ऑल ब्लॅक लुकमध्ये दिसून आला आहे.

आलिया तिचा बेबी बम्प flaunt करत इव्हेंटला जाताना दिसून आली आहे. आलियाचा डार्लिंग्स हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून सध्या त्याची बरीच चर्चा आणि सिनेमाचं खूप कौतुक होताना दिसत आहे. आलिया आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र सिनेमा सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. तर सिनेमाचं नाव गाणं येत्या 8 ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.