प्रे’ग्नंट असूनही शो होस्ट करणारी मीच भारतातील पहिली महिला, भारती म्हणाली; एकाच वेळी करावे लागत आहे ‘हे’ २ काम..

प्रे’ग्नंट असूनही शो होस्ट करणारी मीच भारतातील पहिली महिला, भारती म्हणाली; एकाच वेळी करावे लागत आहे ‘हे’ २ काम..

काही दिवसांपूर्वी अचानकच प्रसिद्ध कॉमेडियन भरती सिंहच्या वजनात चांगलाच फरक झाल्याचे बघायला मिळाले. आपल्याला भारी-भक्कम श’रीरावर स्वतः भारती अनेक विनोद बनवत असे. आणि तिच्या चाहत्यांना तिचा हाच अंदाज खूप जास्त आवडतो. आपल्या जास्त वजनाची लाज न बाळगता तिने त्यातून स्वतःच्या यशाचा मार्ग शोधला आणि त्यात ती यशस्वी देखील झाली.

लग्नाच्या वेळी देखील तिने आपले वजन कमी केले नव्हते. तसे बघता तिचा नवरा हर्ष चांगलाच फिट आहे. मात्र तरीही त्यांचे एकमेकांवर खरे प्रेम होते, म्हणूनच लग्नाच्या वेळी देखील भारतीने वजन कमी नाही केले. मात्र असे असले तरीही आपल्या लग्नात ती खूपच सुंदर आणि क्युट दिसत होती. मग अचानक असं काय झालं की, भारतीने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.

भारतीने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. तर यावर अनेकांनी ती आता आई होण्याच्या तैयारीत असल्याचं सांगितलं. अखेर काही दिवसांपूर्वी आपल्या पतीसोबत एक पोस्ट शेअर करत आपण प्रेग्नन्ट असल्याची गुडन्यूज तिने आपल्या चाहत्यांना दिली. भारती गरोदर असल्याचे समजताच, तिच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले. भारताची लाडकी कॉमेडियन आणि अभिनेत्री भारती सिंग पहिल्यांदाच आई होणार आहे.

कोणत्याही महिलेला गरोदर असताना भरपूर आराम करायची आणि कायम आनंदी राहण्याची गरज असते. मुख्य म्हणजे जास्तीत जास्त आनंदी राहणायची गरज असते. त्यामुळे डॉक्टर देखील गरोदर महिलांना केवळ आनंदी राहण्याचा मुख्य सल्ला देतात. त्यासाठी त्यांना हवं ते त्यांनी करावं, ज्यामध्ये त्यांना आनंद मिळतो ते करावं असं बोललं जातं.

म्हणूनच गरोदर असून देखील कर्लसचा आगामी शो ‘हुनरबाज देश की शान’ च्या चित्रीकरणाला भारतीने सुरूवात केली आहे. प्रे’ग्नेंट असताना देखील काम करत राहण्याचा निर्णय भारतीने घेतलेला निर्णय खरोखर अभिमानस्पद आहे. त्याचबरोबर तिनं देशातील सर्व मॉम्स म्हणजेच आईंना आपला विचार बदलावा असं आवाहन देखील केलं आहे.

‘मी भारतातील पिहिली प्रे’ग्नेंट होस्ट आहे,’ अशा देखील भारतीने यावेळी सांगितलं. या शोचे होस्टिंग भारती आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया करणार असल्याची माहिती समोर आली आहे.येत्या २२ तारखेपासून कर्लसचा ‘हुनरबाज देश की शान’ हा शो सुरू होत आहे. नुकतंच चॅनलने या शोचा प्रोमो आपल्या सोशल मीडियावर टाकला आहे.

या प्रोमोमध्ये भारची सिंग शोसाठी तयार होत असल्याचं दिसत आहे. याच व्हिडियोमध्ये भारतीने स्वत:ला भारतातील पहिली प्रग्नेंट अॅंकर म्हटलं आहे. ‘तो काळ गेला जेव्हा प्रे’ग्नेंट महिला केवळ घरात बसत होत्या. आपल्यावर नेहमीच आपल्या सर्वांच्या आई बंधने लादत असतात. हे करू नको, ते करू नको, विश्रांती घे…. असं त्यांचं मत असतं.

यासाठीच मला आपल्या देशातील संपूर्ण आई वर्गाचा विचार बदलायचा आहे,’ असं भारती यामध्ये बोलताना दिसत आहे. आपल्या नेहमीच्या कॉमेडी अंदाजात भारती पुढे म्हणाली की, ‘हे चॅनेल ३ लोकांकडून काम करून घेत आहे. पण तरीही, पैसे फक्त दोन व्यक्तींचे देत आहे.’

हुनरबाजच्या ‘सेटवर येत आहे देशातील पहिली प्रेग्नेंट महिला होस्ट…आपल्या अपार कष्टाच्या जीवावर भारती बदलत आहे संपूर्ण देशाचा विचार. या नारी शक्तीला करा सलाम आणि बघा हुनरबाज देश की शान. २२ जानेवारीपासून फक्त आणि फक्त तुमच्या कर्लसवर,’ असं म्हणतं कलर्स वाहिनीने प्रोमो शेअर केला आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.