प्रेग्नंट असूनही ‘या’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान श्रीदेवींनी केला होता डान्स आणि अचानक…उर्मिलाने सांगितला तो भयंकर किस्सा…

प्रेग्नंट असूनही ‘या’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान श्रीदेवींनी केला होता डान्स आणि अचानक…उर्मिलाने सांगितला तो भयंकर किस्सा…

बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या श्रीदेवी यांनी जवळपास पाच दशक मनोरंजन सृष्टी वरती अधिराज्य गाजविले. आजही श्रीदेवी यांचा खूप मोठा चाहता वर्ग बघायला मिळतो. 2018 मध्ये अचानक श्रीदेवी यांचे निध’न झाले.

मात्र, त्या अनेक वेगवेगळ्या आठवणी मागे सोडून गेल्या. त्यांच्या सिनेमाच्या माध्यमातून त्या आजही आपल्यात आहेत असेच भासते. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबतच्या खास आठवणी जपून ठेवल्या आहेत. अधून मधून हे कलाकार या आठवणींना उजाळा देत ते किस्से सांगताच असतात.

आणि या प्रत्येक किस्यावरून श्रीदेवी यांचे आपल्या कलेच्या प्रति असणारे डेडिकेशन बघून चहा त्यांना सुखद धक्का बसतो. श्रीदेवी सुरुवातीपासूनच आपल्या कामाच्या प्रती खूप जास्त समर्पित होत्या. आपले संपूर्ण आयुष्यच त्यांनी या मनोरंजन सृष्टीमध्ये घालवले, असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

त्यामध्ये 90 हून अधिक बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्या झळकल्या होत्या. कित्येक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी करिअरच्या अगदी शिखरावर असताना लग्न केले आणि अभिनयातून ब्रेक घेतला. ‘जुदाई’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. त्यानंतर बऱ्याच काळाने त्यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातून पुन्हा पदार्पण केले होते.

इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट देखील कमालीचा सुपरहिट ठरला. मात्र जुदाई चित्रपटाची आज देखील खूप जास्त चर्चा रंगते. अनेक वेगवेगळ्या कारणासाठी हा चित्रपट प्रसिद्ध ठरला. आणि आता पुन्हा एकदा या चित्रपटाच्या दरम्यान चा एक किस्सा अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी सांगितला आहे.

जुदाई मध्ये श्रीदेवी यांच्यासोबतच उर्मिला देखील प्रमुख भूमिकेत झळकली होती. सध्या उर्मिला मातोंडकर ‘डीआयडी सुपर मॉम्स’ या टीव्ही रियालिटी शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. याचवेळी श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने पाहुणी कलाकार म्हणून हजेरी लावली आहे.

त्यावेळी जानवी कपूर सोबतच्या आपल्या नात्याबद्दल बोलताना उर्मिला मातोंडकरणे श्रीदेवी यांच्याशी निगडित एक किस्सा शेअर केला आहे. डीआयडी सुपर मॉम्सच्या मंचावरती एका खास स्पर्धकाचा डान्स पाहून उर्मिला अत्यंत आनंदी होते. हा डान्स बघून आईला साथ देणाऱ्या तिच्या मुलीचा देखील उर्मिला तोंड भरून कौतुक करते.

त्याचवेळी उर्मिलाला दिवंगत अभिनेत्री आणि जानवी कपूरची आई श्रीदेवी यांची आठवण येते. त्यावेळी उर्मिला म्हणाली जान्हवीशी माझं खूप जुनं नातं आहे इतका जुना किती आईच्या पो’टात असल्यापासून मी तिच्यावर प्रेम करत आहे. स्पर्धकाचा डान्स बघून उर्मिला म्हणाली, जुदाई चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान श्रीदेवी ग’र्भव’ती होत्या आणि त्यावेळी श्रीदेवीच्या पो’टात जानवी कपूर होती.

परंतु असं असलं तरीही श्रीदेवी यांनी या गाण्याचं शूटिंग व्यवस्थितपणे पूर्ण केलं. आणि त्यावेळी त्या वेळपासूनच जानवीशी माझ एक खास नातं आहे. 1996 मध्ये जुदाई चित्रपटानंतरच श्रीदेवी यांनी बोनी कपूर सोबत लग्न केले.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.