प्राजक्ता गायकवाडवर को’सळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीच नि’धन, म्हणाली; “रात्री मालिका बघून एकत्र जेवण केलं आणि सकाळी..”

‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी’ या मालिकेत येसू राणीसरकारची भूमिका साकारून प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली. या मालिकेमधून प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. झी मराठीचा नांदा सौख्य भरे या मालिकेतून प्राजक्ताने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. मात्र त्यामध्ये तिला फारशी ओळख मिळाली नाही.
कलर्स मराठी वाहिनीवरील, संत तुकाराम यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत तिने सखुबाईची भूमिका साकारली होती. या भूमिकेत तिच्या कामाचे खास कौतुक देखील करण्यात आले. त्यानंतर मात्र प्राजक्ताने माघे वळून पहिले नाही.
‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी’ या मालिकेत तिला छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी, शूर आणि मुत्सद्दी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणायची संधी मिळाली. आपल्या अभिनयाने तिने येसू राणीसरकारचे पात्र जणू हुबेहूब पडद्यावर आणले. याच काळात तिला प्रचंड प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर देखील तिचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.
प्राजक्ता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. आपले फोटोज आणि येणारे नवीन प्रोजेक्ट्स याबद्दल ती आपल्या चाहत्यांना माहिती देत असते. अनेकवेळा आपलं मन व्यक्त करण्यासाठी देखील प्राजक्ता सोशल मीडियाचा वापर करते. असच काही आता देखील बघायला मिळालं. सतत हसतमुख असणाऱ्या प्राजक्ता सध्या खूप मोठ्या दुःखातून जात आहे.
तिच्या आयुष्यतील सर्वात खास आणि जवळच्या व्यक्तीचे नि’ध’न झाले आहे. तिचे सर्वात चांगले मित्र, तिचे आजोबा यांचे नि’धन झाले आहे. त्यामुळे ती सध्या कमालीची उदास आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तिने सोशल मीडियाचा आधार घेतला.
आपल्या भावनिक पोस्टमध्ये प्राजक्ताने लिहलं आहे, ‘आजोबा… आता कोण बैलगाडी जुंपणार ? आता कोण माझे सर्व लाड पुरवणार ? आता कोण माझ्यासोबत हरिपाठ घेणार ? भक्तिमय अभंग म्हणणार ? तुमच्या संस्कारात भक्तिमय अभंगाची ओढ लागली. शिस्तप्रिय पण तितकाच मनमिळावू स्वभाव.. आक्ख्या गावात रुबाब आणि धाक असायचा, येणाऱ्या प्रत्येकाची चेष्टा मस्करी करून बोलणं.
आपल्या तुकारामाची नात म्हणजे येसूबाईंची भूमिका करणारी म्हणून पूर्ण गावात, तालुक्यात चर्चा.. माझी नात म्हणून तोंडभरून कौतुक करणार आणि तेवढाच अभिमान बाळगणारे. शेवटपर्यंत स्वाभिमानानं , ताठ मानेनं जगलात. सगळं आयुष्य कष्टानं जगलात.
वारकरी संप्रदायात रमणारे, प्रत्येक सप्ताहात वीणा धरणारे, मला लहानपणापासून हरिपाठ, ज्ञानेश्वरी,गाथा आणि संपूर्ण भागवत संप्रदाय शिकवणारे माझे लाडके आजोबा.. कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यातील अश्रू थांबायला तैयार नाहीत. आजोबा-नातीच आपलं हे नातं खूप वेगळं आणि अतूट होतं आणि कायम राहील. देवाच्या मनात काय आहे याचा कधीच कोणी अंदाज लावू शकत नाही.
रात्री सिरीयल बघून एकत्र जेवण करताना आपण किती साऱ्या गप्पा मा’रल्या? किती हसलो सोबत? झोपताना सकाळी आपण मॉर्निंग वॉकला जाऊ असं म्हणलात आणि मला सोडून गेलात. मन अगदी सुन्न झालंय. परत या आजोबा. तुमच्या नातीसाठी परत या. भावपूर्ण श्रद्धांजली.’ प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी, आपणही तिच्या दुःखात सहभागी आहोत, असा दिलासा दिला आहे. अनेकांनी तिच्या आजोबांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे.