प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केला 30 वर्षांपूर्वीचा फोटो, यांतील किती कलाकारांना तुम्ही ओळखलंत?

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केला 30 वर्षांपूर्वीचा फोटो, यांतील किती कलाकारांना तुम्ही ओळखलंत?

प्रत्येकासाठी आपला आठवणींचा कप्पा खास असतो. त्यामध्ये अनेक वेगवेगळे किस्से कैद केलेले असतात. मुळात या आठवणीना जेव्हा आपण उजाळा देतो, तेव्हा भन्नाट गोष्टी समोर येतात. आठवणींचा कप्पा सांभाळून ठेवण्यात सेलिब्रिटीज देखील अपवा’द नाही.

जेव्हा पण सेलिब्रिटींच्या आठवणींना उजाळा देतात, तेव्हा रसिकांसाठी काही खास किस्से समोर येतात. कधीही न ऐकलेले आणि भन्नाट असे किस्से अनेकवेळा हे सेलेब्रिटी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतच असतात. आता अशाच आठवणींना एका मराठी सेलेब्रिटीने उजाळा दिला आहे. अभिनेता भरत जाधव यांनी आपल्या सोशल मीडियावर एक ३० वर्ष जुना फोटो शेअर केला आहे.

अभिनेता भरत जाधव सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. आपले वेगवेगळे फोटोज ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अधून मधून जुन्या आठवणींच्या पेटीतील काही खास किस्से देखील शेअर करत असतात. आणि आता महारष्ट्राची लोकधारा दरम्यानचा एका फोटो त्यांनी शेअर केला आहे.

या फोटोमध्ये, मनोरंजन सृष्टीवर अधिराज्य गाजविलेले काही दिग्ग्ज कलाकार आहेत. “सर्वसाधारण वाटणारा हा फोटो खुप कमाल आहे. महाराष्ट्राची लोकधाराच्या वेळेसचा. साधारणतः ३० वर्षांपूर्वीच्या आठवणींचा. तीन जिवलग मित्र, तीन वेगवेगळ्या विंडो सीट जवळ बसलेले तुम्हाला या फोटोमध्ये बघायला मिळतील.

हे तिघेही मराठी नाटक आणि लोककलेच्या प्रेमाने झपाटलेले. आयुष्यात महत्वाच्या वळणांवर अशी योग्य माणसं भेटत गेली. प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर जगणं किती सुंदर होऊ शकतं हे तिघांनी देखील अनुभवलं आहे’ असं कॅप्शन टाकत भरत जाधव यांनी हा फोटो शेअर केला आहे. ३० वर्षांपूर्वीच्या या फोटोमध्ये सर्वच कलाकार तरुण दिसत आहेत.

त्यामुळे त्यांना ओळखणे चाहत्यांना चांगलेच अवघड जात आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच, चाहत्यांनी त्यावर प्रश्नांचा मारा सुरु केला. अनेकांनी कमेंट करत कोण कोण या फोटोमध्ये आहेत याचं उत्तर देण्याचा देखील प्रयत्न केला. एका युजरने विचारले ‘फोटोमध्ये दिसणारे ते दादूसच आहेत का?’ त्यावर त्याला उत्तर देत भरत जाधव म्हणाले, ‘होय,

शेवटच्या सीट वर मध्यभागी महाराष्ट्राचे लाडके दादूस बसले आहेत..!’ ३० वर्षांपूर्वीच्या दादूसला ओळखणे कठीणच ठरत आहे. मात्र त्यांच्या सच्च्या चाहत्याने त्यांना ओळखलेच. ‘कमाल दिवस’ असं म्हणत अंकुश चौधरीने या फोटोवर कमेंट केली आहे.

हा फोटो बघून अंकुश चौधरींच्या आठवणी देखील ताज्या झाल्या. दरम्यान फोटोमध्ये, भरत जाधव यांनी उल्लेख केलेले तीन कलाकार कोण, याबद्दल कमेंट बॉक्समध्ये चांगलीच चढाओढ सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजविणारे भरत जाधव, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे या तिघांचा उल्लेख, भरत जाधव यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12