प्रसिद्ध दिग्दर्शकाची पत्नी आणि अभिनेत्री चालवत होती से’क्स रॅकेट! करियरच्या सुरुवातीलाच तिच्या फ्लॅटमध्ये अचानक…

प्रसिद्ध दिग्दर्शकाची पत्नी आणि अभिनेत्री चालवत होती से’क्स रॅकेट! करियरच्या सुरुवातीलाच तिच्या फ्लॅटमध्ये अचानक…

बॉलीवूडची ही झगमगती चंदेरी दुनिया बघून सहाजिकच सर्वचजण या जगाकडे आकर्षित होतात. या जगात आपली ओळख निर्माण करावी असे अनेकांचे स्वप्न असते. अनेक कलाकार या दुनियेत प्रवेश तर करतात मात्र, सर्वांचेच स्वप्न पूर्ण होते असं नाही. आपली ओळख निर्माण करण्यासाठी या कलाकरांना चांगलाच संघर्ष करावा लागतो.

सुरुवातीच्या काळात या कलाकारांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावं लागत. खास करून अभिनेत्रींना तर मोठाल्या अडचणींना सामोरे जावं लागत. कोणाला कास्टिंग काऊचं तर कोणाला बदनामीचा सामना करावा लागतो. मात्र एकदा यश पदरी पडलं की या ग्लॅमरच्या दुनियेत आपला साधेपणा जपणं अवघड आहे.

बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी चकचकीतपणापासून दूर असलेल्या आपल्या साध्या आणि साधेपणाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यांच्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची दाद कमवली आहे. अशीच एक अभिनेत्री दीप्ती नवल देखील आहे. आजवर दिप्तीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

‘चष्म-ए-बद्दूर’, ‘साथ-साथ’, ‘कथा’, ‘अनकही’, ‘रंग बिरंगी’ आणि ‘किसी से ना कहना’सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्या झळकल्या आहेत. दीप्ती नवल तिच्यावर लावण्यात आलेल्या काही गंभीर आरोपांमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. दीप्तीला लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. दीप्तीला चित्रकला आवडते.

तिने अनेकवेळा तिच्या चित्रांचे प्रदर्शन देखील ठेवले आहे. 1978 मध्ये रिलीज झालेल्या जुनून या चित्रपटातून दीप्तीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही मिळाला आहे. 1981 मध्ये रिलीज झालेल्या चश्मे बद्दूर या चित्रपटाने दिप्तीला बॉलीवूडमध्ये एका खास जागा मिळवून दिली.

या चित्रपटाने त्यांना चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख दिली. दीप्ती नवल यांच्याशी कोणताही मोठा वाद नाही, परंतु एका गैरसमजामुळे समाजात सर्वात घृणास्पद समजले जाणारे काम केल्याचा आरोप तिच्यावर झाला. एका मुलाखतीत अभिनेत्री दीप्ती नवलने माहिती दिली की, तिने करिअरच्या सुरुवातीलाच फ्लॅट खरेदी केला होता.

यादरम्यान ती अनेकदा येथे पार्ट्या करत असे. त्यांना भेटायला पत्रकारही यायचे. मित्रमंडळी आणि त्यांच्या क्षेत्राशी निगडित अनेक लोक यायचे. अशा परिस्थितीत फ्लॅटमधील इतर लोक तिला सेक्स रॅकेट चालवणारी महिला समजू लागले. दीप्ती पुढे म्हणाली की ती तिची चूक आहे की ती तिच्या शेजाऱ्यांसारखी नव्हती.

कारण तिच्या शेजाऱ्यांना इतरांच्या आयुष्यात काय सुरु आहे यातच अधिक रस होता. त्यामुळे येथील लोकांनी बनावट गोष्टी पसरवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी एका वृत्तपत्राने त्यांच्याबद्दल अशी बातमी प्रसिद्ध केली होती की, दीप्ती सेक्स रॅकेट चालवते. त्यादरम्यान तिला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले.

मात्र त्या काळात प्रकाश झा यांनी तिला मोलाची साथ दिली. दीप्तीने 1985 मध्ये चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याशी लग्न केले पण 2002 मध्ये घटस्फोट झाला. यानंतर तिने प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचा मुलगा विनोद पंडित याच्याशी लग्न केल्याची माहिती आहे, परंतु दोघांचे लग्न होण्यापूर्वीच विनोद पंडित यांचे निधन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12