प्रसिद्ध क्रिकेटपटूचं निधन, ICUमधून वडिलांना पत्र लिहीत, म्हणाला; ‘मला खेळण्यापासून अडवू नका, पण आयुष्याची लढाई हरला…

आज क्रिकेट या खेळाचे जगभरातून करोडो चाहते आहेत. एक उत्तम क्रिकेटपटू बनायचं आणि देशासाठी खेळ खेळायचं असं स्वप्न आज लाखो तरुण बघत आहेत. असं असलं तरीही सर्वांचेच स्वप्न पूर्ण होत नाही. यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.
मात्र आता, आयपीएल सारख्या टूर्नामेंट मुळे देशातील काना-कोपऱ्यातील क्रिकेटपटू समोर येऊन आपली प्रतिभा दाखवू शकत आहेत. त्यामुळे अनेक प्रतिभावान खेळाडू आपल्या संघामध्ये खेळ खेळत आहेत. हार्दिक पांड्या, चहर, सारख्या खेळाडूंसाठी इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.
मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि आज ते भारतीय क्रिकेट संघासाठी खेळत आहेत. असच एक स्वप्न हिमाचल प्रदेशचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्मा याने देखील पाहिलं होत. मात्र त्याच हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. रणजी ट्रॉफीच्या सामन्यासाठी सिद्धार्थ पूर्णपणे फिट होता. 2017-18 मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
रणजी ट्रॉफीमध्ये डिसेंबर महिन्यात अखेरचा सामना कोलकात्यातील इडन गार्डन्सवर खेळताना त्याने एका डावात 5 विकेटसह एकूण 7 गडी बाद केले होते. इतका उत्तम खेळाडू असून देखील आपल्या देशासाठी खेळण्याच त्याच स्वप्न अपूर्ण राहील. अचानक प्रकृती बिघडल्यानंतर सिद्धार्थ शर्माला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
त्याला बोलताही येत नव्हतं. जवळपास दोन आठवडे तो व्हेंटिलेटरवर होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना गेल्या सिद्धार्थचं आठवड्यात निधन झालं. वयाच्या फक्त २८ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. भारतीय संघात खेळण्याचं त्याचं स्वप्न होतं. रुग्णालयात दाखल असताना त्याला बोलता देखील येत नव्हतं मात्र त्यास्थितीत देखील सिद्धार्थने क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.
याबाबत त्याने वडिलांना पत्रही लिहिलं होतं. मात्र त्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. सिद्धार्थचा सहकारी खेळाडू प्रशांत चोप्राने सांगितलं की, सिद्धार्थ आयसीयूमध्ये असताना तो शुद्धीत होता पण त्याला बोलता येत नव्हतं. नर्सकडून कागद घेऊन त्याने आपल्या वडिलांना पत्र लिहिलं होतं. ‘तुम्ही मला क्रिकेट खेळण्यापासून थांबवू नका, मला खेळू द्या,’ असं त्यानं आपल्या पत्रामध्ये लिहलं होत.
सिद्धार्थचं हे पत्र वाचून आमचे मॅनेजर आणि आम्ही आपले अश्रू रोखू शकलो नाही, असं सिद्धार्थच्या मित्राने म्हटलं. दरम्यान, सिद्धार्थचे वडील लष्करात आहेत आणि त्यामुळे आपल्या मुलाने देखील लष्करातच सामील व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या मुलाने क्रिकेट खेळावं असं त्यांना वाटत नव्हतं. प्रशांत चोप्राने म्हटलं की, आम्ही त्याला लव्ह चार्जर म्हणत होतो.
नेहमीच तो या गाण्यावर डान्स करायचा. यामुळेच त्याला या नावाने हाक मारायचो. जेव्हा रणजी ट्रॉफीत त्याने पदार्पण केलं तेव्हा तो माझा रूममेट होता. मात्र काही काळासाठी तो बाहेर पडला होता. सिद्धार्थचं पुनरागमन विजय हजारे ट्रॉफीच्या वेळी झालं. या सामन्यात बाद फेरीवेळी त्याने बजावलेली भूमिका आम्हाला विजेता बनवण्यासाठी महत्त्वाची ठरली. गुजरातच्या वडोदरा इथं गेल्या आठवड्यात सिद्धार्थचं रुग्णालयात निधन झालं.