प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला बॉलिवूडमधील तिचा अनुभव, म्हणाली; चित्रपट काम देण्यासाठी दिग्दर्शकाने घरी एकटं बोलावून मला…

प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला बॉलिवूडमधील तिचा अनुभव, म्हणाली; चित्रपट काम देण्यासाठी दिग्दर्शकाने घरी एकटं बोलावून मला…

बॉलीवूडमध्ये काम करून एक अभिनेत्री बनायचं स्वप्न रोज कित्येक मुली बघतात. आपल्या देशातील जवळपास दहा पैकी सात मुलींनी कमीत कमी एकदा तरी बॉलीवूड अभिनेत्री बनायचं स्वप्न पाहिलेलंच असत. अनेक मुली आपले स्वप्न पूर्ण कारण्यासाठी चांगलाच संघर्ष देखील करतात.

मात्र काही निवडक मुलीच्याच नशिबात ते यश असतं. अभिनेत्री बनल्यानंतर आणि स्टार झाल्यानंतर, आपलं स्टारडम टिकवून ठेवणं देखील तेवढंच जास्त अवघड असत. काही दिवस देखील तुम्ही चर्चे’त नसाल, तर हळूहळू बॉलीवूड आणि तुमचे चाहते देखील तुम्हाला विसरून जातात. अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी सुरुवातीच्या काळात चांगलीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली.

मात्र, ते यश त्यांना टिकवून ठेवता आलं नाही आणि आता कदाचितच त्यांना कोणी ओळखत. इशा कोप्पीकर सुद्धा अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलीवूडमध्ये ‘खल्लास गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी इशा कोप्पीकर आता फारशी कोणाला आठवत देखील नाही. मात्र आता इशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

तिने आपल्याकडे काम नसल्याने एकटं पडलो असल्याची खंत व्यक्त केली आहे. एका मुलाखती दरम्यान इशा कोप्पीकर म्हणाली की, ‘मी जशी आहे तशीच राहते. अनेकांना त्यामुळे मी ऍरोगंट वाटते. मात्र तस नाहीये. दिखाऊपणा मला जमत नाही. कोणी माझ्यासोबत वाईट किंवा चुकीचे वर्तन केले तर मला उत्तर द्यावेच लागणार ना.

आणि माझ्या याच स्वभावामुळं मला बॉलीवूड मध्ये देखील खूप वेळा टी’केचा सामना करावा लागला. त्यामुळे मी अनेक प्रोजेक्ट्स देखील गमावले.’ १९९८ मध्ये ‘एक था दिल एक थी धडकन’ या सिनेमातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र तिच्या या सिनेमाला अपयशाचा सामना करावा लागला.

त्यानंतर तिने नागार्जुन आणि इतर काही साऊथच्या सुपरस्टार अभिनेत्यांसोबत साऊथ सिनेमामध्ये देखील काम केले. कंपनी सिनेमातील खल्लास गाण्यामुळं तिला बॉलीवूडमध्ये नवीन ओळख मिळाली. आणि त्यानंतर फिजा, प्यार इश्क और मोहब्बत, कंपनी, कांटे, पिंजर आणि दिल का रिश्ता सारख्या सिनेमामध्ये देखील तिने काम केले.

मुलाखतीमध्येच कास्टिंग का’ऊचं बद्दल तिला विचारण्यात आलं तेव्हा तिने बॉलीवूडमध्ये सर्रासपणे हे सर्व प्रकार घडतात अशी पुष्टी दिली. इशा म्हणाली, ‘एका प्रसिद्ध निर्मात्याने मला २००० च्या मध्यात काम देतो असं सांगून बोलावले. त्याने मला सांगितले की, नायकांच्या खास लिस्टमध्ये तुझं नाव असं आवश्यक आहे.

याचा अर्थ त्यावेळी मला समजला नाही, म्हणून मी माझ्या ओळखीच्या एका नायकाला कॉल केला आणि त्याबद्दल विचारले. तेव्हा हे सर्व फोनवर बोलू शकत नाही म्हणून त्याने मला एकट्यात भेटायला बोलावले. त्यावेळी त्या अभिनेत्यावर धो’का देण्याचा आरोप लावला जात होता. म्हणून सेफ राहावं म्हणून त्याने मला एकटीला बोलवलं आणि स्टाफ पैकी कोणाला देखील घेऊन न येण्याचा सल्ला दिला.

मला हे सर्व चांगलाच खटकलं, आणि सुरु असलेला प्रकार माझ्या लक्षात आला. मी आता जिथं पण आहे, ते माझ्या टॅलेंट आणि मेहनती मूळ आहे, असं मी निर्मात्याला ठसकावून सांगितलं. मात्र सहाजिकच मला त्या सिनेमातून काढून टाकण्यात आले.’ इशा कोप्पीकर आपल्या हॉ’ट आणि बो’ल्ड अंदजामुळं केवळ बॉलीवूडच नाही तर साऊथ इंस्ट्रीमध्ये देखील प्रसिद्ध होती. मात्र आता तिला फार कोणी ओळखत नाही.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.