प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय, पतीच्या नि’धनानंतर घेतला ‘हा’ अवयव दान करण्याचा निर्णय….

प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय, पतीच्या नि’धनानंतर घेतला ‘हा’ अवयव दान करण्याचा निर्णय….

सत्यवान सावित्रीची कथा तर तुम्ही ऐकलीच असेल. त्यांचे प्रेम, त्याग आणि बलिदानाची कथा ऐकून पती पत्नीचे नाते कसं असावं याच उदाहरण समोर येते. मात्र आजच्या व्यवहारिक जगात असं प्रेम बघायला मिळणं दुर्मिळच. आपल्या जोडीदारावर प्रेम करण्याचे दावे तर सगळेच करतात, मात्र जेव्हा खरोखर साथ देण्याची वेळ येते तेव्हा कितीजण साथ देतात?

पण आजच्या व्यवहारिक आणि कृत्रिम जगात देखील आपल्या जोडीदारासाठी, प्रेम सिद्ध करणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आपला जोडीदार महत्वाची भूमिका साकारत असतात. आपल्या आयुष्यात केवळ आपला एक जोडीदार असतो जो नेहमीसाठी आपल्या सोबत असतात.

त्यामुळं आपल्या जोडीदाराने जगाचा निरोप घेतल्यानंतर अनेकजण त्यांच्या आठवणीत वेगवेगळे निर्णय घेतात. अनेकवेळा हे निर्णय सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतात. असाच एक मोठा निर्णय तामिळ सिनेसृष्टीतील अभिनेत्रीने केला आहे. सध्या तिने घेतलेल्या या निर्णयाचे सगळीकडे कौतुक होत आहे.

तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी प्रसिद्ध अभिनेत्री मीनाने नुकतंच अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. सोशल मीडियावर, पोस्ट शेअर करत या अभिनेत्रीने आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणाली, “जीव वाचवण्याइतक कोणतंही महान इतर कोणतंच कार्य नाही.

जीव वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग अवयव दान हे एक आहे. अवयव दान हे एक मोठं वरदान आहे. दीर्घ आजाराला झुंज देणाऱ्या अनेकांसाठी ही दुसरी संधी असते. ज्याचा मी वैयक्तिकरित्या सामना केला आहे.” यातच अभिनेत्री मीना पुढे म्हणाली, “जर वेळेवर कोणी समोर आलं असत तर कदाचित माझ्या सागरला (म्हणजेच मीनाच्या नवऱ्याला).

जे माझं आयुष्य बदलू शकलं असतं! एक डोनर एक-दोन नाही तर चक्क आठ जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे मला आशा आहे की, प्रत्येकाला अवयवदानाचे महत्त्व समजलं असेल.” आपल्या पोस्टमध्ये ती पुढे म्हणाली, “हे फक्त डोनर आणि प्राप्तकर्ते आणि डॉक्टर यांच्यासाठी नाही. याचा कुटुंबं, मित्र, सहकारी आणि ओळखीच्यांवर खूप परिणाम होतो.

खूप काळानंतर मला अवयव दानाचे महत्व समजले आहे. आणि त्यामुळेच आज मी माझे अवयव दान करण्याची शपथ घेत आहे.” अभिनेत्रीने दिवंगत पती विद्यासागर यांना श्रद्धांजली अर्पण करत, आपल्या पोस्टचा शेवट केला. ती बोलली की, “तुमचा वारसा हाच जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. लव्ह मीना सागर.”

दरम्यान, विद्यासागर यांना फुफ्फुसाच्या समस्येवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच 28 जून रोजी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्यांचे नि’धन झाले.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.